Skip to main content
पुरंदर तालुक्यातील माहूर धरणावर शेतकऱ्यांच्या मोटारीच्या केबल व मोटार चोरी अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील माहूर धरण परिसरातील अज्ञात चोरट्याने शेतकऱ्यांच्या पाणी उपसा मोटारीच्या केबल वायर तसेच एक मोठी चोरी केलीची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिवाजी जयसिंग गोळे, नितीन विठ्ठल जगताप, बाळा सुभाषराव जगताप, गजानन प्रल्हाद जगताप, सोमनाथ बारीकराव खोमणे, आणि ज्ञानेश्वर जयवंत जगताप या माहूर येथील शेतकऱ्यांचे मिळून 36,500 रुपयांचा आयवेज चोरीस गेला असून, सासवड पोलीस ठाण्यामध्ये आज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 303 /2 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चार जुलै रोजी दुपारी बारा ते सहा जुलै रोजी सकाळी दहा या कालावधीमध्ये माहूर धरण परिसरामध्ये ही चोरी झाली फिर्यादी शिवाजी जयसिंग गोळे हे धरणावरील त्यांच्या मोटारची पाहणी करण्यासाठी गेले असता ,मोटारी जवळील केबल वायर कापून चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले, त्यानंतर परिसरातील इतर मोठया धारकांची पाहणी केली असता, नितीन विठ्ठल जगताप यांची 200 फुट लांबीची केबल वायर ,बाळा सभाजीराव जगताप यांची 200 फुट केबल वायर ,गजानन प्रल्हाद जगताप यांची 200 फुट केबल वायर, सोमनाथ बारीकराव खोमणे यांची १०० फूट केबल तसेच ज्ञानेश्वर जगताप यांची 200 फुट केबल वायर आणि टेक्समो कंपनीची पाच एचपी क्षमतेचे मोटर चोरीस केल्याची समोर आले असून, फिर्यादी शिवाजी जयसिंग गोळे यांची ही शंभर फूट लांबीची केबल वायर चोरट्याने कापून नेल्यास स्पष्ट झालेया सर्व शेतकऱ्यांचा केबल वायर व मोटार असा एकूण 36 हजार 500 रुपयाचा मुद्देमाल आज्ञात चोरट्याने लंपास केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे .परिंचे दूरक्षेत्र येथे दाखल झालेल्या तक्रारीवरून सासवड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा क्रमांक ३१०-२०२६ नोंदवण्यात आला आहे .या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार समर बनसोडे करीत असून,सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली या आरोपींचा शोध सुरू आहे.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment