Posts

‘जल्लोष २०२६’मध्ये वाघिरे महाविद्यालयाची दमदार कामगिरीविविध कला प्रकारांत विद्यार्थ्यांनी पटकावली पारितोषिके; महाविद्यालयात जल्लोष सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळातर्फे आयोजित ‘जल्लोष २०२६’ या युवा महोत्सवातील विविध कला प्रकारांत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वाघिरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सासवडच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर घातली. विविध दहा कला प्रकारांत विद्यार्थ्यांनी पारितोषिके मिळविल्याने महाविद्यालय परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले.शास्त्रीय नृत्य प्रकारात शमिका मोने हिने प्रथम क्रमांक मिळविला. व्यंगचित्र प्रकारात श्रेयस पवार याने द्वितीय, तर कोलाज प्रकारात नूतन वैराट हिने तृतीय क्रमांक पटकावला. स्थळ छायाचित्रणात तेजस फडतरे याने द्वितीय क्रमांक मिळविला. स्वरवाद्य वादनात ज्ञानेश्वरी पवार हिने, तर पोस्टर मेकिंगमध्ये गायत्री म्हेत्रे हिने तृतीय क्रमांक मिळविला.सांघिक कला प्रकारांतही वाघिरे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपली चमक दाखविली. पथनाट्याने द्वितीय क्रमांक, तर एकांकिका, मूकनाट्य आणि लोकवाद्यवृंदाने तृतीय क्रमांक मिळविला. विद्यार्थ्यांनी सादरीकरणातील कल्पकता, कलात्मकता आणि सांघिक कौशल्याच्या जोरावर ही कामगिरी केली.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तुषार शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. किरण गाढवे, प्रा. पूनम काळे, प्रा. उत्कर्षा जगताप आणि शैलेश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना कला सादरीकरणासाठी सातत्याने प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळाल्याने हे यश संपादन करता आले.या उल्लेखनीय यशाबद्दल प्राचार्य डॉ. तुषार शितोळे यांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. उपप्राचार्य डॉ. संजय झगडे, डॉ. बबन माने, समन्वयक डॉ. नरसिंग गिरी आणि प्रा. सचिनकुमार शहा यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.

Image

आयुष्यात पुढे जाण्यासाठी स्पोर्ट्स कल्चर फार महत्त्वाचे सिंधुताई सपकाळ यांच्या लेकींशी कृष्णराज महाडिक यांचा फेस टू फेस संवाद“• ममता बाल सदन संस्थेला दिली सदिच्छा भेट सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: मुुलींनो स्वतःला कधीच कमजोर समजू नका. कारण आज महिला पुरुषांच्या बरोबरीने कर्तृत्व सिद्ध करू लागल्या आहेत. जर तुमच्या “लाईफमध्ये अप-डाऊन आले तर स्पोर्ट्समधून प्रेरणा मिळते. स्पोर्ट असे क्षेत्र आहे की जे तुम्हाला कायम स्फूर्ती आणि प्रेरणा देत राहील ज्यामुळे तुमच्यामध्ये शिस्त निर्माण होईल. मी स्वतः स्पोर्ट्समधून पुढे आलेलो आहे. त्यामुळे आयुष्यात पुढे जाण्यासाठी स्पोर्ट्स कल्चर फार महत्त्वाचे ठरते, असा विश्वास भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी व्यक्त केला. पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ माईंच्या मायेने आणि संस्कारांनी उभ्या राहिलेल्या ममता बाल सदन (बालगृह), कुंभारवळण येथे भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी सदिच्छा भेट देऊन माईंच्या लेकींशी फेस-टू-फेस मनमोकळा संवाद साधला. मुलींनीही क्रीडा क्षेत्र, करिअर आणि भविष्यातील संधींबाबत उत्सुकतेने संवाद साधला. यावेळी क्रीडा क्षेत्रातील आपले अनुभव मुलींसमोर मांडले. शिक्षण, रोजगार, स्वावलंबन, सुरक्षितता, करिअर आणि जीवनातील अडचणींपासून ते मनाच्या तळातून आलेल्या प्रश्नांपर्यंत मुलींनी अनेक प्रश्न महाडिक यांच्यासमोर मोकळेपणाने मांडले. यावेळी मुलींशी संवाद साधताना कृष्णराज महाडिक म्हणाले, “काही प्रश्न शिक्षणाचे असतील... काही रोजगाराचे असतील... काही स्वावलंबनाचे असतील... काही मुलींच्या सुरक्षिततेचे असतील... तर कदाचित एखादा प्रश्न अगदी मनाच्या तळातून आलेला असेल. कुठलाही प्रश्न असो, आपण मला मनमोकळेपणाने विचारा. मी आपल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन.”“तुमच्यासारख्या मुलींच्या स्वप्नांना समाजाची साथ कशी मिळेल?” या प्रश्नाचे उत्तर केवळ शब्दांत नव्हे, तर संवादातून आणि संवेदनशीलतेतून मिळायला हवे, अशी भावना व्यक्त करत त्यांनी माईंच्या सर्व लेकींना आवाहन केले, “मनातला प्रश्न मनात ठेवू नका... आज मनमोकळेपणाने विचारा! कारण माईंच्या घरात प्रश्न विचारण्यासाठी परवानगी लागत नाही; इथे प्रश्न मायेने ऐकले जातात आणि उत्तरांना आधाराची जोड दिली जाते.”या आवाहनानंतर मुलींनीही मनातील अनेक प्रश्न थेट महाडिक यांच्यासमोर मांडले. महाडिक यांनी मुलींच्या प्रत्येक प्रश्नाला मनापासून आणि समर्पक उत्तरे देत त्यांच्या जिज्ञासेला प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाच्या प्रारंभी पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ माईंच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ममता बाल सदनचे अध्यक्ष दीपक गायकवाड यांच्या हस्ते कृष्णराज महाडिक यांचा शाल, श्रीफळ तसेच पिंपळ व तुळशीचे रोप देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमानंतर महाडिक यांनी ममता बाल सदन परिसराची पाहणी केली. त्यांनी संस्थेची गोशाळा आणि बेकरी यांना भेट देऊन तेथील कामकाजाची माहिती घेतली. माईंच्या कार्यातून उभ्या राहिलेल्या विविध उपक्रमांची त्यांनी आस्थेने पाहणी केली. यावेळी पुणे व सासवड परिसरातील भाजपचे तुषार झुरंगे,अजिंक्य टेकवडे तसेच विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमास अधीक्षिका स्मिता पानसरे, संचालक गोपाल गायकवाड, प्रसन्न गायकवाड, संजय गायकवाड, सुजाता गायकवाड, सरपंच मंजुषा गायकवाड, नाना कुंभारकर यांच्यासह ममता बाल सदनमधील मुली मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जनसंपर्क अधिकारी मुकेश चौधरी यांनी केले. चौकट *असे विचारले प्रश्न ?* “एक चांगला नेता होण्यासाठी अभ्यास, वक्तृत्व, धाडस आणि संवेदनशीलता यापैकी कोणत्या गुणाला आपण सर्वाधिक महत्त्व देता?”, “अनाथ किंवा वंचित मुलांना समाजात समान संधी मिळण्यासाठी युवकांनी कोणती भूमिका बजावली पाहिजे?”, “आपल्या आई-वडिलांकडून मिळालेला असा कोणता संस्कार आहे, जो आपण आयुष्यभर जपता?”, “ग्रामीण भागातील मुलींना उच्च शिक्षण आणि चांगल्या करिअरच्या संधी मिळाव्यात यासाठी शासन आणि समाजाने आणखी काय करायला हवे?”, तसेच “महाराष्ट्रभर प्रवास करताना युवकांच्या कोणत्या प्रश्नाने आपल्याला सर्वाधिक विचार करायला लावले?” असे विविध प्रश्न मुलींनी विचारले. मुलींच्या प्रश्नांना सुद्धा त्यांनी तितकीच दिलखुलास उत्तरे दिली.

Image

निखिल जगताप यांना ‘आदर्श पत्रकार साहित्य रत्न पुरस्कार’ने सन्मानित सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील बेलसर गावचे सुपुत्र, पत्रकार,साहित्यिक व प्रसिद्ध निवेदक निखिल सतिश जगताप यांना हडपसर येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे रविवार (दि.२७) रोजी झालेल्या १०० व्या राज्यस्तरीय पुणे मराठी काव्य संमेलनात ‘आदर्श पत्रकार साहित्य रत्न पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.रानकवी प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानाई फाउंडेशन कला साहित्य विचार मंच, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने या राज्यस्तरीय काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.पत्रकारिता व साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत निखिल जगताप यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. बेलसर गावच्या सुपुत्राला मिळालेल्या या सन्मानामुळे पुरंदर तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.या पुरस्काराबद्दल निखिल जगताप यांचे विविध क्षेत्रातील मान्यवर, सहकारी, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

Image

वाघीरे महाविद्यालयात गांधी जयंतीनिमित्त जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वाघीरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सासवड येथे १५७ व्या महात्मा गांधी जयंतीनिमित्त राष्ट्रीय छात्रसेनेच्या (NCC) वतीने विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. स्वच्छ भारत, स्वस्थ भारत, क्षयरोगमुक्त भारत व तंबाखूमुक्त भारत या विषयांवर कॅडेट्सनी पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती केली.या कार्यक्रमात ३६ महाराष्ट्र बटालियन, २ महाराष्ट्र गर्ल्स बटालियन आणि ३ महाराष्ट्र नेव्हल युनिट च्या एकूण १०४ NCC कॅडेट्सनी सहभाग घेतला.कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून पोस्टर स्पर्धा, जनजागृती रॅली आणि नुक्कड नाटक यांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांच्या माध्यमातून स्वच्छता, आरोग्य, क्षयरोग प्रतिबंध आणि तंबाखूविरोधी जनजागृतीचा संदेश देण्यात आला. यावेळी लेफ्टनंट गजेंद्र अहिवळे यांनी कॅडेट्सना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी स्वच्छता, आरोग्य आणि सामाजिक जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले. प्रा. सौ. मयुरी जाधव यांनी गर्ल कॅडेट्स ना मार्गदर्शन केले व आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमास श्री. अंकुश धायगुडे व श्री. आकाश यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. तुषार शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. याप्रसंगी श्री अंकुश धायगुडे व आकाश राऊत व NCC कॅडेट्स आणि एनसीसी प्रमुख यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

Image

पुरंदर तालुक्यातील भिवरी येथील एचपी पेट्रोल पंपा जवळील संजीवनी आईस्क्रीम येथे युवकास तीन इसमाकडून मारहाण करून जीवे मारण्याची धमकी सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: एक ऑक्टोंबर रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास भिवरी तालुका पुरंदर येथील एचपी पेट्रोल पंपा जवळील संजीवनी आईस्क्रीम येथे 27 सप्टेंबर रोजीच्या जुन्या भांडणाच्या कारणावरून 1 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारामध्ये यश फडतरे व त्यांच्यासोबत असणाऱ्या दोन इसमांनी युवकाच्या कपाळावर, पाठीवर छातीवर अंगावर बांबूच्या काठीने मारहाण करून, दुखापत करून जीवे मारण्याची धमकी दिली असून, यश फडतरे राहणार बोपगाव तालुका पुरंदर जिल्हा पुणे व तेजा सोबत असणाऱ्या दोन अनोळखी इसमानी मारहाण केल्याच्या कारणावरून त्यांचा पूर्ण पत्ता माहीत नाही म्हणून, फिर्यादी मयूर सुभाष ढोणे वय 26 वर्ष व्यवसाय शेती राहणार गराडे तालुका पुरंदर जिल्हा पुणे त्यांनी सासवड पोलीस स्टेशनला या तीन युवका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या अधिपत्याखाली पोलीस हवालदार अविनाश होळकर हे पुढील तपास करीत आहेत.

Image

पुरंदर तालुक्यातील कोडीत खुर्द येथील चांबळी कोडित रोड गट नंबर 130 मधून लाईटच्या ट्रान्सफॉर्मर ची चोरी सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: 29 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजायच्या ते सकाळी आठ तीस वाजताच्या सुमाराच्या दरम्यान मोजे कोडीत खुर्द येथील चांबळी कोडीत रोड गट नंबर 130 मधील तुकाराम बाळा बडधे यांच्या शेता मधून चोरीस गेलेल्या लाईटच्या ट्रान्सफॉर्मर चे एक पंधरा हजार रुपये किमतीचे ट्रान्सफॉर्मर मधील अंदाजे 160 लिटर ऑइल जु. वा.की. अं दोन पस्तीस हजार रुपये किमतीचे ट्रांसफार्मर मधील अंदाजे 80 किलो वजनाचे कॉपर जु.वा. की.अं एकूण पन्नास हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या तारा चोरून नेऊन, ऑइल सांडून नुकसान केलेले असून, बडधे यांच्या शेतामध्ये मधील डीटीसी कोड 40 47 झिरो 99 डीटीसी कॅपॅसिटी 22 शंभर के व्ही ए डी टी सी नेम चांबळी रोड नंबर वन ट्रान्सफॉर्मर कोणीतरी अज्ञात चोरट्याने मुद्दाम व लबाडीच्या एरियाद्याने खोलून नेऊन त्या ठिकाणी चोरी केली आहे. म्हणून फिर्याद अजिनाथ दशरथ मिसाळ वय 52 वर्ष नोकरी वरिष्ठ तंत्रज्ञ महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कार्यालय चांबळी त्यांनी सासवड पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे .वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या अधिपत्याखाली पुढील तपास पोलीस हवालदार विनायक हाके हे पुढील तपास करीत आहेत.

Image

पुरंदर तालुक्यातील घटना गावठी पिस्तूल सात जीवंत काढतु से आणि तलवार सराईत गुन्हेगार सासवड पोलिसांच्या ताब्यामध्ये तर मोरया सोसायटीतुन शोध पथकाची कारवाई ब्रीजा सात लाख 66 हजाराचा मुद्देमाल पोलिसानी केला जप्त सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: एक सप्टेंबर रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर राऊत सासवड पोलीस स्टेशन यांना गोपनीय माहिती मिळाली नुसार ,इसम नामे शुभम राजपुरे राहणार मोरया सोसायटी तालुका पुरंदर जिल्हा पुणे यांच्या गाडीमध्ये पिस्टल असल्याची माहिती मिळाल्याने, सदर ठिकाणी वरिष्ठ अधिकारी यांना माहिती देऊन त्या ठिकाणी मोरया सोसायटी येथे पथकासह जाऊन, सदर ठिकाणी वरील इसम मिळून आल्याने, त्यास पोलीस पथकाची ओळख करून देऊन, त्याच्या ताब्यातील मारुती सुझुकी कंपनीची मोटार क्रमांक एम एच बारा टी एम 85 30 ही दोन पंचांना बोलावून त्यांच्या समक्ष गाडीची झडती घेतली असता, त्यांच्या गाडीच्या डॅशबोर्डच्या खालील कप्प्यात एक गावठी बनावटीचे पिस्टल हे अग्निशास्त्र दोन मॅक्झिन सात जिवंत काढतुसे एक कालया रंगाची मॅन असलेली तीन फूट लांबीची स्टीलची तलवार मिळून आल्याने, जप्ती कारवाई करून पोलीस स्टेशन येथे घेऊन त्याला सासवड पोलीस स्टेशन येथे 487/ 2026 शस्त्र अधिनियम 3, 4, 25 सह कलम महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3),135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, सदर आरोपीस अटक करण्यात आली आहे. एक साठ हजार रुपये एक स्टीलचे लोखंडी बॉडी चे गावठी पिस्टल त्याचे बॅरल ची लांबी 17.7 सेंटीमीटर असून,व्यास आठ मिमी पिस्टलचा ट्रिगर व मुठीवर दोन्ही बाजूने कालया रंगाची प्लॅस्टिक पट्टी स्क्रूच्या साह्याने फिट केलेली त्यावर दोन्ही बाजूने स्टार असलेली जु.वा. की.अं दोन हजार रुपये किमतीची 11 सेंटीमीटर लांब व 2.8 cm रुंदीची दोन मॅक्झिन जु.वा. की.अं तीन तीन पाचशे रुपये किमतीचे के एफ 7.65.एम एम वे सात जिवंत राऊंड जु.वा. की.अं चार दोन हजार रुपये किमतीची एक तीन फूट लांबीची तलवार पुढील बाजूस निमुलती होत गेलेली तिच्या एका बाजूने भोथट व दुसऱ्या बाजूने धार असलेली पावणे दोन इंच रुंदीची तलवार त्याला सहा इंच लांबीची पितळी मूठ सोबत कालया रंगाची मॅग असलेली जु.वा. की.अं पाच सात लाख रुपये किमतीची एक पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी कंपनीची ब्रिजा चार चाकी गाडी तिचा आरटीओ नंबर एम एच बारा टी एम 85 30 असा असलेली जु.वा. की. अं एकूण झिरो सात 66 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक आरोपीवर विविध कालमान्वये 16 गुन्हे दाखल पहिले असून, त्या ठिकाणी सदरची ही कारवाई पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग गणेश बिराजदार, अप्पर पोलीस अधीक्षक पुणे विभाग शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी भोर पुरंदर विभाग राजेंद्र सिंह गौर,वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सासवड पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर राऊत ,पोलीस हवालदार दत्तात्रय काळे ,पोलीस हवालदार विशाल जाधव ,महिला पोलीस हवालदार भुजबळ (म्हेत्रे) हेमा ,पोलीस नाईक गोकुळ हिप्परकर, पोलीस कॉन्स्टेबल तुषार लोंढे, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण शेंडे ,पोलीस कॉन्स्टेबल अक्षय चिल्ले, पोलीस कॉन्स्टेबल किवळे सचिन ,पोलीस शिपाई तेजस शिवतरे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर राऊत हे पुढील तपास करीत आहेत.

Image

कीर्तनाच्या माध्यमातून पर्यावरण जनजागृतीचा संदेश तेरवीच्या कार्यक्रमाला पर्यावरणाची जोड पाहुण्यांना बेल-तुळस आणि फळझाडांची रोपे भेट सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: “झाड जगवणे हीच खऱ्या अर्थाने मृतात्म्याला श्रद्धांजली आहे. आपण लावलेले एक झाड उद्या कुणाच्या माथ्यावर सावली देईल, कुणाला गोड फळ देईल, एखाद्या पक्ष्याला निवारा देईल आणि असंख्य जीवांना शुद्ध हवा देईल...” या हृदयस्पर्शी शब्दांतून ह.भ.प. श्री. रामकृष्ण महाराज अकोटकर यांनी बोराळा येथे पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.दर्यापूर तालुक्यातील बोराळा येथे स्व. श्री. प्रकाशराव विश्वनाथराव चौधरी यांच्या तेरवीच्या कार्यक्रमाला अनोखी पर्यावरणपूरक जोड देण्यात आली. पारंपरिक धार्मिक विधींसोबत ह.भ.प. श्री. रामकृष्ण महाराज अकोटकर यांच्या भावपूर्ण कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. या कीर्तनातून त्यांनी उपस्थित ग्रामस्थ, नातेवाईक आणि पाहुण्यांना पर्यावरण संरक्षणाची जाणीव करून देत, “प्रत्येक कुटुंबाने आपल्या आनंदाच्या अथवा दुःखाच्या प्रसंगी किमान एक तरी झाड लावून ते जगवावे,” असे भावनिक आवाहन केले.कीर्तनातून संतविचारांचा दाखला देत महाराज म्हणाले की, संत तुकाराम महाराजांनी वृक्ष-वेली, वनचर आणि निसर्गाशी असलेले माणसाचे अतूट नाते अधोरेखित केले आहे. वृक्ष-वेली आणि वनचर हे आपले सगेसोयरे आहेत, ही संतांची शिकवण आजच्या पर्यावरणीय संकटाच्या काळात अधिकच मोलाची ठरते. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पसायदानातील “भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे” ही प्रार्थना केवळ मानवी सुखापुरती मर्यादित नसून सर्व जीवांमध्ये मैत्री, करुणा आणि विश्वकल्याणाची भावना जागवणारी आहे. तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेत ग्रामस्वच्छता, ग्रामविकास, निसर्गसंवर्धन आणि सार्वजनिक संपत्तीचे जतन यांना सामाजिक जबाबदारीशी जोडले आहे. संतांच्या या विचारांना कृतीची जोड देत चौधरी परिवाराने आज समाजासमोर एक सकारात्मक आदर्श निर्माण केला असल्याचे त्यांनी सांगितले. तेरवीसाठी आलेल्या पाहुण्यांना विविध वृक्षांची रोपे प्रेमपूर्वक भेट देण्यात आली. यामध्ये ७१ बेलवृक्षांची रोपे, ७१ तुळशीची रोपे, ७१ सीताफळ, ७१ आंबा, ७१ फणस, ७१ पेरू, ७१ कवठ, ७१ कडुनिंब तसेच चारोळी आदी विविध वृक्षांच्या रोपांचा समावेश होता. या उपक्रमामुळे तेरवीचा कार्यक्रम हा केवळ एका कुटुंबाचा शोकप्रसंग न राहता, पर्यावरण संवर्धनाची सामाजिक चळवळ बनविण्याचा प्रयत्न ठरला. यावेळी पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांचे चिरंजीव अरुणभाऊ सपकाळ, श्रीमती उषा प्रकाशराव चौधरी, विजया रोडे, साधना खुळे, निर्मला आखरे, शोभा तायडे, पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ ट्रस्टचे जनसंपर्क अधिकारी मुकेश चौधरी, मंगेश चौधरी, संत गाडगे बाबा बालगृहाचे व्यवस्थापक गजानन देशमुख, राज्य वन्यजीव बोर्डाचे माजी सदस्य यादव तरटे पाटील, डॉ. शिरीष नाईक, सुनील कडू, विनाकायराव कडू, रितेश वानखडे, मनोज पाटील तायडे यांच्यासह गावातील नागरिक, नातेवाईक आणि पाहुणे मोठ्या संख्येने उपस्थित होते.---चौकट : पर्यावरणाशी बांधिलकी जोपासली – अरुणभाऊ सपकाळ “आजच्या काळात झाड लावण्यापेक्षा झाड तोडले जाण्याचे चित्र आपल्या समोर आहे. विकासाच्या नावाखाली असो अथवा अन्य कोणत्याही कारणाने, वृक्षतोड सुरू आहे. अशा परिस्थितीत एखाद्या व्यक्तीच्या स्मृती केवळ अश्रूंनी नव्हे, तर हिरवाईने जपण्याचा संकल्प मी प्रथमच अनुभवत आहे.”“स्व. श्री. प्रकाशराव विश्वनाथराव चौधरी यांच्या तेरवीच्या कार्यक्रमाला एका वेगळ्या, समाजोपयोगी आणि पर्यावरणपूरक संकल्पाची जोड देण्यात आली आहे. नातेवाईक व पाहुण्यांना वृक्षांची रोपे भेट देऊन चौधरी परिवाराने पर्यावरणाशी असलेली आपली बांधिलकी कृतीतून जपली आहे. या रोपांचे संवर्धन झाले, तर आज दिलेली ही छोटीशी भेट उद्या मोठ्या हिरवाईत रूपांतरित होईल,” अशी भावना पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांचे चिरंजीव अरुणभाऊ सपकाळ यांनी व्यक्त केली.

Image

प्रथिनयुक्त आहार निर्मितीची जिल्हास्तरीय स्पर्धा उत्साहात संपन्न सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: राष्ट्रीय पोषण माह अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS), महिला व बाल विकास विभाग, जिल्हा परिषद पुणे यांच्या वतीने THR (Take Home Ration) साहित्यामधून प्रथिनयुक्त आहार तयार करण्याची जिल्हास्तरीय स्पर्धा आज पुणे येथे उत्साहात पार पडली.“आहारातील विविधता आणि पुरेसे प्रथिने” या संकल्पनेवर आधारित या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 'टेक होम रेशन 'रेसिपीचा प्रभावी वापर करून पौष्टिक, चविष्ट, आकर्षक व किफायतशीर आहार तयार करण्यास सहभागी अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.या स्पर्धेसाठी SNDT कॉलेज ऑफ होम सायन्स, पुणे येथील Human Ecology and Community Science विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. ललिता भगत यांना प्रमुख अतिथी व परीक्षक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.स्पर्धेतील पाककृतींचे परीक्षण करताना पोषणमूल्य, प्रथिनांचे प्रमाण, THR साहित्याचा वापर, चव, आकर्षकता, किफायतशीरपणा, पाककृती तयार करण्यासाठी लागणारा वेळ तसेच बालकांसाठी तिची उपयुक्तता या विविध निकषांचा विचार करण्यात आला.यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. ललिता भगत यांनी सांगितले की, बालकांच्या सर्वांगीण वाढीसाठी केवळ पोट भरणे पुरेसे नसून संतुलित व पोषणमूल्ययुक्त आहार मिळणे अत्यंत आवश्यक आहे. प्रथिने ही बालकांच्या शारीरिक वाढीसाठी, स्नायूंच्या विकासासाठी आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी महत्त्वाची आहेत. उपलब्ध THR साहित्याचा कल्पकतेने वापर करून विविध पौष्टिक पदार्थ तयार करता येतात, असे त्यांनी स्पष्ट केले.“आपले स्वयंपाकघर हीच आपल्या घरातील पहिली पोषण प्रयोगशाळा आहे. स्थानिक व सहज उपलब्ध डाळी, कडधान्ये, धान्ये, शेंगदाणे, तीळ आदी पदार्थांचा योग्य वापर करून पौष्टिक आहार तयार करता येतो,” असेही त्यांनी नमूद केले.अंगणवाडी सेविका या केवळ बालकांना आहार देणाऱ्या कार्यकर्त्या नसून पोषण व आरोग्य जनजागृतीच्या महत्त्वाच्या दूत आहेत, असे सांगून त्यांनी सर्व सहभागींचे कौतुक केले.या स्पर्धेमुळे THR साहित्याचा अधिक प्रभावी वापर, पौष्टिक आहाराबाबत जनजागृती आणि बालकांमधील कुपोषण प्रतिबंधासाठी नाविन्यपूर्ण पाककृतींची देवाणघेवाण होण्यास मदत झाली.कार्यक्रमात श्री आनंद खंडागळे, जिल्हा कार्यक्रमाधिकारी, श्री नितीन पवार विस्तार अधिकारी, तसेच महिला व बाल विकास विभागातील अधिकारी, अंगणवाडी सेविका तसेच संबंधित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Image

विद्या किशोर म्हस्के यांच्या सेवानिवृत्ती सोहळ्याने आठवणींना उजाळा सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे शेठ गोविंद रघुनाथ साबळे कॉलेज ऑफ फार्मसी अँड पॉलिटेक्निक, सासवड येथे महाविद्यालयाच्या मुख्य लिपिका विद्या किशोर म्हस्के यांच्या ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनिमित्त भावपूर्ण सेवानिवृत्ती व निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमास पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपसचिव लक्ष्मण पवार, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे शंकरराव उरसळ कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटर, खराडीचे प्राचार्य डॉ. अशोक भोसले, डॉ. अश्विनी शेवाळे, तसेच शेठ गोविंद रघुनाथ साबळे कॉलेज ऑफ फार्मसी अँड पॉलिटेक्निक, सासवडच्या प्राचार्य डॉ. राजश्री चव्हाण, उपप्राचार्य डॉ. स्मिता पवार व विभागप्रमुख विशाखा गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक विशाखा गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. दिपाली जगताप, प्रा. पूजा पिसाळ व प्रा. जयश्री नाळे यांनी केले. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सहकाऱ्यांनी विद्या म्हस्के यांच्या ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवाकाळातील आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला. महाविद्यालयीन प्रशासकीय कामकाजात त्यांनी दिलेले योगदान, कर्तव्यनिष्ठा, शिस्तप्रियता, संयमी स्वभाव आणि सहकाऱ्यांशी असलेले आपुलकीचे संबंध यांचा उपस्थितांनी आवर्जून उल्लेख केला.प्राचार्य डॉ. राजश्री चव्हाण तसेच उपस्थित मान्यवरांनी विद्या म्हस्के यांच्या प्रदीर्घ सेवाकार्याचे कौतुक करून त्यांच्या पुढील आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी म्हस्के यांचा सन्मान करून त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. विद्या म्हस्के यांनी आपल्या मनोगतात महाविद्यालयातील ३५ वर्षांच्या सेवाकाळातील विविध अनुभव, सहकाऱ्यांकडून मिळालेले प्रेम व सहकार्य आणि अविस्मरणीय आठवणी भावपूर्ण शब्दांत व्यक्त केल्या. आपल्या सहकाऱ्यांशी असलेले ऋणानुबंध आठवताना वातावरण भावुक झाले.कार्यक्रमाचा समारोप उपप्राचार्य डॉ. स्मिता पवार यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. उपस्थित सर्वांनी विद्या म्हस्के यांच्या पुढील आयुष्यासाठी आनंद, उत्तम आरोग्य, समाधान व सुख-समृद्धीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

Image

पुरंदर तालुक्यातील वनपुरी येथील जमिनीच्या व्यवहारांमध्ये बनावट असे आधार कार्ड पॅन कार्ड वापरा मधून दोन दस्त : तर एक कोटी 79 लाखांचा व्यवहार, सहा जणांना अटक सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: वनपुरी तालुका पुरंदर येथील एक कोटी 79 लाख रुपयाच्या जमिनीच्या व्यवहारांमध्ये जमीन मालक असलेल्या महिलेच्या नावानेच कथित असे बनावट आधार कार्ड ,पॅन कार्ड तयार करून, त्या व्यक्तीच्या ऐवजी तोतया महिला उभी करून, दोन जमीन खरेदी दस्त नोंदवून, तब्बल अशा एक कोटी 79 लाख रुपयाचा व्यवहार केला असून, विनोद प्रल्हाद सुद्रिक वय 45 राहणार कोंढवा पुणे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार आर्थिक गुन्हे शाखेने तपासा अंती बाबू उर्फ सुशील सोपान शिवरकर, दशरथ बबन जानकर आणि मोहन हिरामण गायकवाड या तीन जणांना अटक केली आहे. एडवोकेट विद्या संदीप कामथे, रोहित संजय पवार, संतोष किसन मेमाणे तसेच प्रियाली परदेशी या नावाने दस्तावर सही करणाऱ्या अनोळखी महिलेविरुद्ध सुद्धा गुन्हा दाखल केलेला आहे. व्यवहाराचा केलेला आरोप असताना फिर्यादी जमीन खरेदी विक्रीचे एजंट असून ,पुरंदर तालुक्यातील वनपुरी येथील गट क्रमांक २५२ मधील ७५ गुंठे आणि गट क्रमांक २५८ मधील 14 एकर पन्नास गुंठे जमीन विक्रीस असल्याचे त्यांना सांगण्यात आले असताना, या जमिनी ची मालकी प्रियाली राकेश परदेशी यांच्या नावावर असल्याचे नमूद करण्यात आले. 12 फेब्रुवारी 2025 रोजी सासवड दस्त नोंदणी कार्यालयामध्ये संबंधित जमिनीचे दोन दस्त करण्यात आले आहेत .गट क्रमांक २५२ मधील व्यवहारासाठी दस्त क्रमांक 1788/ 2025 तर गट क्रमांक 228 साठी दस्त क्रमांक 1789/ 2025 असा करण्यात आला आहे. या व्यवहारांमध्ये चेक द्वारे 20 लाख रुपये आणि दस्तावर चार लाख रुपये असे घेण्यात आल्याचे, तसेच रोख स्वरूपामध्ये एक कोटी 55 लाख रुपये घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आलेला आहे. बोगस महिलेचा वापर प्रामुख्याने ऍडव्होकेट विद्या संदीप कामथे दस्त नोंदणी वेळी मूळ जमीन मालक प्रियाली परदेशी यांच्या नावाने दुसऱ्या महिलेला उभी करून तिची ओळख पटवून, देण्यात आल्याचा आरोप केलेला आहे. एडवोकेट विद्या संदीप कामथे यांनीच प्रियाली परदेशी असल्याचे सांगितल्याचे फिर्यादीमध्ये नमूद केलेले आहे. सातबारा उतारा तपासल्यानंतर मूळ मालकांच्या निदर्शनास हा प्रकार आलेला आहे. त्यानंतरच सासवड पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळेच कथित बनावट ओळखपत्रे जमीन मालकीची पडताळणी दस्त नोंदणीची प्रक्रिया आणि पैशाच्या देवाण-घेवाणीची साखळी ही पूर्णपणे तपासाचा महत्त्वाचा एक प्रकारे भाग ठरणार आहे, दस्त नोंदणीच्या वेळी सादर करण्यात आलेली ओळखपत्रे छायाचित्रे अथवा नोंदणीशी संबंधित असणाऱ्या माहितीची दुय्यम निबंधक कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज बँक व्यवहार आणि रोख रकमेच्या व्यवहाराचे देवाण-घेवानिशी काय संबंध आहे, त्याचीही पुरावे तपासात महत्त्वाचे ठरणार आहेत, त्यामुळेच आर्थिक गुन्हे शाखेने बाबू उर्फ सुशील शिवरकर, दशरथ जानकर आणि मोहन गायकवाड यांना अटक केलेली असून, अन्य आरोपींचा शोध सुरू आहे, असे आर्थिक गुन्हे शाखेने प्रतिनिधीला ही सर्व माहिती दिली.तसेच जमीन फसवणुकीतील बोगस महिलाही अटकेत न्यायालयाकडून दोन दिवसाची पोलीस कोठडी प्रस्तावित विमानतळ प्रकल्पाच्या वनपुरी येथील जमीन व्यवहारात बनावट महिला उभी करून, बोगस खरेदीखत केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने आणखी तिघांना अटक केली असून, अर्चना मिरकुटे ,संकेत कोकरे आणि गणेश टिळेकर अशी आरोपींची नावे आहेत, यापूर्वीही बाबू उर्फ सुशील शिवरकर, दशरथ जानकर आणि मोहन गायकवाड यांना अटक झाली होती सर्व सहा आरोपींना सासवड न्यायालयाने आणखी दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून, वन पुरीतील गट क्रमांक २५२ आणि २५८ मधील जमीन प्रियाली राकेश परदेशी यांच्या मालकीचीच असताना, त्यांच्या जागी बोगस महिला उभी करून बनावट दस्त तयार केल्याचा आरोप आहे ,या व्यवहारातून एकूण एक कोटी 79 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तर एडवोकेट विद्या संदीप कामथे, रोहित पवार आणि संतोष मेमाणे अद्यापही फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे.अशी सविस्तर माहिती मिळाली.

Image

पुरंदर तालुक्यातील सासवड बाजारामध्ये ज्वारी प्रतिक्विंटला 4,951 दर ;तर गहू प्रति क्विंटला 3,300 दर                              सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                        पुरंदर तालुक्यातील निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सासवड उप बाजारांमध्ये धान्याची मोठ्या प्रमाणामध्ये आवक झाली असून, बुधवार दि.30 सप्टेंबर ज्वारीला प्रतिक्विंटला सर्वाधिक 4,951 रुपयांचा दर; तर गहू प्रति क्विंटला 3,300 दर मिळाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती संदीप फडतरे यांनी दिली. सासवड उप बाजारात वाघापूर, माळशिरस, परिचे, गराडे,  दिवे,वाल्हे, राजुरी, सह संपूर्ण पुरंदर, बारामती, दौंड, इंदापूर, भोर अशा विविध भागातून ज्वारी, बाजरी, गहू ,तांदूळ, हरभरा असे धान्य विक्रीसाठी येते, एक नंबर प्रतिच्या ज्वारीला कमाल 4,951तर दोन नंबरच्या ज्वारीला किमान 3,811 तर सरासरी 4,381हजार रुपये प्रतिक्विंटल असा दर, एक नंबर प्रतीच्या गहू कमाल 3,300 तर दोन नंबरच्या गहू ला किमान 2,851 तर सरासरी 3,075 हजार रुपये प्रति क्विंटलला दर मिळाला असे सचिव मिलिंद जगताप यांनी सांगितले. यावेळी सभापती संदीप फडतरे, गणेश होले, सुशांत कांबळे,उपसभापती बाळासो शिंदे, संचालक शरद जगताप, वामन कामठे, देविदास कामठे,  शरयू वाबळे,  भाऊसो गुलदगड, uपंकज निलाखे, अनिल माने, अशोक निगडे, संचालिका शहजान शेख,बाळासाहेब गुलाब जगदाळे,लिपिक विकास  कांबळे,यासह व्यापारी रूपचंद कांडगे,  सत्यवान पवार, , बाबु पवार ऋषिकेश  टेडसॅ, शैलेश विरकर, गुळाला 4,900रुपये भाव निरा बाजारात गुळाची आवक 5,66बॉक्स  113क्विंटल झाली होती, या गुळाला प्रतिक्विंटल किमान 4,400 कमाल दर 4,900रुपये तर साधारण4,700रुपये मिळाला याबाबत सहसचिव नितीन किकले, कृष्णा खलाटे, प्रवीण कर्णवर यांनी माहिती दिली. यावेळी गुळ व्यापारी शांती कुमार कोठडीया उपस्थित होते, उप बाजारातील धान्य आवक दर,  प्रतिक्विंटल,  मध्ये पीक, किमान, कमाल, सरासरी ज्वारी 3,811,4,951,4,381. बाजरी 2,800,3,200,3,000. गहू 2,851,3,300,3,075. तांदूळ  ---------------------.हरभरा 5,600, 6,000,5,800.

Image

पुरंदर तालुक्यातील वनपुरी येथील जमिनीच्या व्यवहारांमध्ये बनावट असे आधार कार्ड, पॅन कार्ड वापरा मधून दोन दस्त : तर एक कोटी 79 लाखांचा व्यवहार, तीन जणांना अटक सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: वनपुरी तालुका पुरंदर येथील एक कोटी 79 लाख रुपयाच्या जमिनीच्या व्यवहारांमध्ये जमीन मालक असलेल्या महिलेच्या नावानेच कथित असे बनावट आधार कार्ड ,पॅन कार्ड तयार करून, त्या व्यक्तीच्या ऐवजी तोतया महिला उभी करून, दोन जमीन खरेदी दस्त नोंदवून, तब्बल अशा एक कोटी 79 लाख रुपयाचा व्यवहार केला असून, विनोद प्रल्हाद सुद्रिक वय 45 राहणार कोंढवा पुणे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार आर्थिक गुन्हे शाखेने तपासा अंती बाबू उर्फ सुशील सोपान शिवरकर, दशरथ बबन जानकर आणि मोहन हिरामण गायकवाड या तीन जणांना अटक केली आहे. एडवोकेट विद्या संदीप कामथे, रोहित संजय पवार, संतोष किसन मेमाणे तसेच प्रियाली परदेशी या नावाने दस्तावर सही करणाऱ्या अनोळखी महिलेविरुद्ध सुद्धा गुन्हा दाखल केलेला आहे. व्यवहाराचा केलेला आरोप असताना फिर्यादी जमीन खरेदी विक्रीचे एजंट असून ,पुरंदर तालुक्यातील वनपुरी येथील गट क्रमांक २५२ मधील ७५ गुंठे आणि गट क्रमांक २५८ मधील 14 एकर पन्नास गुंठे जमीन विक्रीस असल्याचे त्यांना सांगण्यात आले असताना, या जमिनी ची मालकी प्रियाली राकेश परदेशी यांच्या नावावर असल्याचे नमूद करण्यात आले. 12 फेब्रुवारी 2025 रोजी सासवड दस्त नोंदणी कार्यालयामध्ये संबंधित जमिनीचे दोन दस्त करण्यात आले आहेत .गट क्रमांक २५२ मधील व्यवहारासाठी दस्त क्रमांक 1788/ 2025 तर गट क्रमांक 228 साठी दस्त क्रमांक 1789/ 2025 असा करण्यात आला आहे. या व्यवहारांमध्ये चेक द्वारे 20 लाख रुपये आणि दस्तावर चार लाख रुपये असे घेण्यात आल्याचे, तसेच रोख स्वरूपामध्ये एक कोटी 55 लाख रुपये घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आलेला आहे. बोगस महिलेचा वापर प्रामुख्याने ऍडव्होकेट विद्या संदीप कामथे दस्त नोंदणी वेळी मूळ जमीन मालक प्रियाली परदेशी यांच्या नावाने दुसऱ्या महिलेला उभी करून तिची ओळख पटवून, देण्यात आल्याचा आरोप केलेला आहे. एडवोकेट विद्या संदीप कामथे यांनीच प्रियाली परदेशी असल्याचे सांगितल्याचे फिर्यादीमध्ये नमूद केलेले आहे. सातबारा उतारा तपासल्यानंतर मूळ मालकांच्या निदर्शनास हा प्रकार आलेला आहे. त्यानंतरच सासवड पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळेच कथित बनावट ओळखपत्रे जमीन मालकीची पडताळणी दस्त नोंदणीची प्रक्रिया आणि पैशाच्या देवाण-घेवाणीची साखळी ही पूर्णपणे तपासाचा महत्त्वाचा एक प्रकारे भाग ठरणार आहे, दस्त नोंदणीच्या वेळी सादर करण्यात आलेली ओळखपत्रे छायाचित्रे अथवा नोंदणीशी संबंधित असणाऱ्या माहितीची दुय्यम निबंधक कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज बँक व्यवहार आणि रोख रकमेच्या व्यवहाराचे देवाण-घेवानिशी काय संबंध आहे, त्याचीही पुरावे तपासात महत्त्वाचे ठरणार आहेत, त्यामुळेच आर्थिक गुन्हे शाखेने बाबू उर्फ सुशील शिवरकर, दशरथ जानकर आणि मोहन गायकवाड यांना अटक केलेली असून, अन्य आरोपींचा शोध सुरू आहे, असे आर्थिक गुन्हे शाखेने प्रतिनिधीला ही सर्व माहिती दिली.

Image

आरोग्य व ध्यान सत्राचे आयोजन सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: एस.एन.डी.टी. आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज फॉर वुमेन, पुणे येथे प्रथम वर्ष बी.बी.ए. व बी.सी.ए.च्या विद्यार्थिनींसाठी ‘आरोग्य व ध्यान’ (Health & Meditation) या विषयावर विशेष मार्गदर्शनपर सत्राचे आयोजन करण्यात आले. हे सत्र Induction Programme 2026–27 अंतर्गत आयोजित करण्यात आले होते.या सत्रासाठी एस.एन.डी.टी. कॉलेज ऑफ होम सायन्स, पुणे येथील डॉ. ललिता भगत यांना मार्गदर्शक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी विद्यार्थिनींना आरोग्यदायी जीवनशैली, शारीरिक व मानसिक स्वास्थ्य, तणावमुक्त जीवन, ध्यानाचे महत्त्व आणि दैनंदिन जीवनात आरोग्यपूर्ण सवयींचा अंगीकार याविषयी मार्गदर्शन केले.संवादात्मक पद्धतीने झालेल्या या सत्रामध्ये विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. ध्यान व मनःशांतीच्या माध्यमातून एकाग्रता, सकारात्मक विचारसरणी आणि मानसिक संतुलन कसे साधता येते, याचेही मार्गदर्शन करण्यात आले.या उपक्रमाबद्दल एस.एन.डी.टी. आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजच्या बीसीए/बीबीए विभागाचे समन्वयक डॉ. रवींद्र हांडे आणि प्राचार्य डॉ. भरत विहंगकाटे यांनी डॉ. ललिता भगत यांचे आभार मानले. विद्यार्थिनींसाठी हे सत्र आरोग्य, ध्यान आणि सकारात्मक जीवनशैलीच्या दृष्टीने उपयुक्त व प्रेरणादायी ठरले.

Image

निधन वार्ता मुक्ताबाई पवार यांचे निधन सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील दिवे पंचक्रोशीतील पवारवाडी गावच्या राहिवाशी व आदर्श शेतकरी मुक्ताबाई सोपाना पवार (वय वर्षे 80) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन विवाहित मुली, सुना व नातवंडे असा परिवार असून संत सोपानकाका सहकारी बँकेचे माजी व्यवस्थापक विलास सोपान पवार व सासवड बार असोसियनचे माजी अध्यक्ष ॲड. मनोहर सोपान पवार यांच्या त्या आई होत.

Image

निधन वार्ता दिनकर खेडेकर यांचे निधन सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज पुरंदर तालुक्यातील गुऱ्होळी गावचे राहिवाशी व प्रगतशीर शेतकरी दिनकर एकनाथ खेडेकर (वय वर्षे 81) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी, नातवंडे असा परिवार असून सासवड येथील रेनबो कॉम्प्युटर एज्युकेशचे मालक दत्तात्रय दिनकर खेडेकर यांचे तें वडील होत.

Image

वाघिरे महाविद्यालयात ‘फिल्म कॅम्पस क्लब’ची स्थापना‘गिरणी’ लघुपटाच्या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक व सर्जनशील विचारांना चालना सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे वाघिरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सासवड येथे विद्यार्थ्यांना चित्रपटाच्या माध्यमातून शिक्षण, कला आणि सामाजिक वास्तव यांची सांगड घालता यावी, या उद्देशाने ‘फिल्म कॅम्पस क्लब’ची स्थापना करण्यात आली. क्लबच्या उद्घाटनानिमित्त प्रसिद्ध दिग्दर्शक उमेश कुलकर्णी दिग्दर्शित ‘गिरणी’ या लघुपटाचे विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले.‘गिरणी’ या लघुपटाला २००४ साली तीन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. घरामध्ये पिठाची गिरणी आल्यानंतर त्या घरातील एका लहान मुलाच्या मानसिकतेत आणि वर्तनात हळूहळू होत जाणाऱ्या बदलाचे संवेदनशील व कलात्मक चित्रण या लघुपटातून करण्यात आले आहे. दैनंदिन जीवनातील एका साध्या घटनेच्या माध्यमातून मानवी मन, कौटुंबिक संबंध, बदलते सामाजिक वास्तव आणि बालमानसशास्त्र यांचा वेध घेण्याचा प्रयत्न चित्रपटात करण्यात आला आहे.लघुपटाच्या प्रदर्शनानंतर विद्यार्थ्यांशी साधक-बाधक चर्चा आयोजित करण्यात आली. या चर्चेमध्ये विद्यार्थ्यांनी चित्रपटातील आशय, व्यक्तिरेखांचे मानसशास्त्र, दिग्दर्शकीय मांडणी, प्रतीकात्मकता, सामाजिक संदर्भ तसेच आजच्या बदलत्या जीवनशैलीशी चित्रपटाचा असलेला संबंध यावर आपली मते व्यक्त केली.प्राध्यापकांनीही चित्रपटाच्या विविध पैलूंचे विश्लेषण करताना चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून सामाजिक वास्तव समजून घेण्याचे आणि विचारप्रक्रियेला चालना देण्याचे प्रभावी माध्यम असल्याचे स्पष्ट केले. चित्रपटातील दृश्यभाषा, ध्वनी, अभिनय, कॅमेरा आणि कथानकाच्या माध्यमातून आशय अधिक प्रभावीपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतो, यावरही चर्चा झाली.फिल्म कॅम्पस क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे सार्थक, दर्जेदार आणि आशयपूर्ण चित्रपट व लघुपट पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासोबतच चित्रपट प्रदर्शनानंतर चर्चा, समीक्षण, संवाद आणि विश्लेषणात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनाच्या दृक्-श्राव्य पद्धतीची ओळख करून देणे, कलाकृतींकडे चिकित्सक दृष्टीने पाहण्याची सवय निर्माण करणे आणि कलेविषयी अभिरुची विकसित करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.चित्रपटांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता, कल्पनाशक्ती, निरीक्षणशक्ती आणि चिकित्सक विचारक्षमतेला चालना देण्याचा प्रयत्न या क्लबच्या माध्यमातून केला जाणार आहे.तसेच विविध सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि मानसशास्त्रीय विषयांवरील चित्रपटांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समाजाकडे अधिक संवेदनशील आणि व्यापक दृष्टिकोनातून पाहण्याची संधी मिळणार आहे.चित्रपट पाहताना केवळ कथानक समजून न घेता त्यामागील दिग्दर्शकीय दृष्टिकोन, कलात्मक भाषा, सामाजिक आशय आणि मानवी मूल्ये समजून घेण्यावर क्लबच्या उपक्रमांमध्ये भर दिला जाणार आहे.महाविद्यालयातील विविध शाखांतील विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी करून घेत बहुविषयक अध्ययनाला चालना देण्याचा मानस असल्याचे आयोजकांनी सांगितले.विद्यार्थ्यांनीही ‘गिरणी’ या लघुपटाच्या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत चर्चेत सक्रिय सहभाग नोंदविला. चित्रपटाच्या माध्यमातून एखाद्या सामाजिक व मानसशास्त्रीय विषयाकडे वेगळ्या पद्धतीने पाहण्याची संधी मिळाल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा फिल्म कॅम्पस क्लब दर शनिवारी नियमितपणे कार्यरत राहणार आहे. आगामी काळात विविध आशयघन चित्रपटांचे प्रदर्शन, चित्रपट समीक्षण, दिग्दर्शक व तज्ज्ञांशी संवाद, कार्यशाळा तसेच विद्यार्थ्यांच्या लघुपट निर्मितीस प्रोत्साहन देणारे उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. संजय झगडे, डॉ. नरसिंग गिरी, फिल्म कॅम्पस क्लबचे समन्वयक प्रा. सुनील शिंदे, प्रा. डॉली पटेल, प्रा. महेश देवकर, प्रा. पूर्वराणी जगताप, प्रा. राजेश सोनवणे, प्रा. सविता पिंगळे, प्रा. निकिता कुंभार आणि प्रा. दिव्या पिलाने यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.फिल्म कॅम्पस क्लबच्या स्थापनेमुळे वाघिरे महाविद्यालयाच्या शैक्षणिक वातावरणात चित्रपट, कला, सामाजिक जाणीव आणि चिकित्सक विचार यांचा अभिनव संगम घडून येणार असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Image

जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त औषध गुणवत्ता व रुग्णसुरक्षेबाबत मार्गदर्शन सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शेठ गोविंद रघुनाथ साबळे कॉलेज ऑफ फार्मसी व पॉलिटेक्निक, सासवड येथे जागतिक फार्मासिस्ट दिन २०२६ निमित्त विशेष जनजागृती व शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावर्षीच्या कार्यक्रमात “औषधांची गुणवत्ता, सुरक्षितता व परिणामकारकता सुनिश्चित करण्यात अन्न व औषध प्रशासन आणि फार्मासिस्टची भूमिका” या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. पुणे विभागाच्या अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक मा. रझिया शेख या प्रमुख अतिथी व व्याख्यात्या म्हणून उपस्थित होत्या.यावेळी सासवड केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष श्री. धैर्यशील शिंदे तसेच पुणे जिल्हा महिला कार्यकारिणी सदस्या सौ. शुभांगी जगताप यांनी फार्मासिस्ट प्रतिनिधी म्हणून प्रमुख उपस्थिती दर्शविली.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. आर. एस. चव्हाण यांनी फार्मसी व्यवसायातील बदलत्या जबाबदाऱ्या अधोरेखित करताना रुग्णांच्या सुरक्षिततेमध्ये फार्मासिस्टची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले.मार्गदर्शनपर व्याख्यानात मा. रझिया शेख यांनी औषधांची गुणवत्ता, सुरक्षितता व परिणामकारकता, योग्य साठवणूक, वितरण व्यवस्था, नियामक नियमांचे पालन, औषधांची तपासणी तसेच रुग्णांना योग्य औषधविषयक मार्गदर्शन या विषयांवर विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.तसेच त्यांनी अन्न व औषध प्रशासनाची कार्यपद्धती, औषध निरीक्षकांच्या जबाबदाऱ्या, औषधांच्या गुणवत्तेची तपासणी, निकृष्ट दर्जाच्या औषधांपासून होणारे संभाव्य धोके, औषधांच्या सुरक्षित वापरासाठी आवश्यक खबरदारी तसेच फार्मासिस्टच्या व्यावसायिक व नैतिक जबाबदाऱ्या याबाबत मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे देत संवादात्मक पद्धतीने मार्गदर्शन केले. या संवादातून विद्यार्थ्यांना औषधांच्या सुरक्षित वापराबरोबरच औषधांची गुणवत्ता, रुग्णसुरक्षा आणि रुग्णहिताचे संरक्षण यामध्ये फार्मासिस्टची महत्त्वपूर्ण भूमिका समजून घेण्यास मदत झाली.या कार्यक्रमाच्या माध्यमातून “फार्मासिस्ट हा केवळ औषधांचे वितरण करणारा व्यावसायिक नसून औषधांची गुणवत्ता, सुरक्षितता आणि रुग्णहित यांचा महत्त्वपूर्ण संरक्षक आहे,” हा प्रभावी संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य डॉ. आर. एस. चव्हाण, उपप्राचार्य डॉ. एस. जे. पवार, पॉलिटेक्निक विभागाच्या विभागप्रमुख सौ. व्ही. एस. गायकवाड, श्री. एस. व्ही. भिसे, कु. पी. के. म्हस्के आणि सौ. पी. ओ. पाटसकर यांनी समन्वय साधला.

Image

पुरंदर तालुका दुष्काळग्रस्त अखेर जाहीरच ; तर माजी आमदार संजय जगताप यांच्या पाठपुराव्याला यश सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: खरीप हंगाम 2026 मध्ये पावसाने अखेर खूप मोठी ओढ दिल्याच्या कारणामुळे संकटात सापडलेल्या पुरंदर तालुक्याला अखेर शासनाकडून दिलासा मिळालेला आहे, मदत व पुनर्वसन विभागाने 25 सप्टेंबर 2026 रोजी शासन निर्णय क्रमांक समिती 2026 प्र.क 82 जाहीर करत राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे, या यादीत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्याचा समावेश करण्यात आलेला आहे .कृषी आयुक्तांनी सादर केलेल्या अहवालात पुरंदरसह अनेक तालुक्यांमध्ये सरासरी पेक्षा खूपच कमी पर्जन्य झाल्याचे स्पष्ट झाले होते दुष्काळ व्यवस्थापन सहितेनुसार ही कारवाई करण्यात आली असून, सहसचिव संजय इंगळे यांनी या आदेशावर स्वाक्षरी केली आहे ,जगताप यांच्या पाठपुराव्याला यश हा निर्णय जाहीर होताच, पुरंदर हवेलीचे माजी आमदार आणि भाजपा नेते संजय चंदुकाका जगताप यांनी शासनाचे आभार मानलेले आहेत, गेल्या अनेक दिवसापासून ते पुरंदर तालुका दुष्काळग्रस्त यादी समाविष्ट करावा यासाठी सातत्याने पाठपुरावा करत होते सासवड ,जेजुरी, वाल्हे, परिंचे, पांगारे, सोनोरी ,रिसेपिसे, राजुरी,मालशिरस ,सुपा पानवडी, कालदरी,वीर, माहूर या भागात त्यांनी स्वतः जाऊन शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी केली होती ,सोयाबीन, मका, बाजरी, कांदा या पिकाची झालेली नुकसान आणि पाणीटंचाईची विदारक परिस्थिती त्यांनी शासन दरबारी मांडली होती, त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. तातडीने अंमलबजावणी करा : संजय जगताप.संजय जगताप मनाले की शासनाने आमच्या मागणीची दखल घेऊन पुरंदरचा समावेश दुष्काळी यादीत केला त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद देत आहेत ,मात्र केवळ घोषणा करून थांबू नये, शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या 12 सवलतीची अंमलबजावणी तातडीने झाली पाहिजे जेणेकरून बळीराजाला प्रत्यक्ष लाभ मिळेल, पुरंदरच्या शेतकऱ्यांना या 12 सवलती मिळणार शासन निर्णयानुसार पुरंदर तालुक्यातील पुढील सवलती लागू होणार आहेत, एक जमीन महसुलात सूट, दोन पीक कर्जाचे पुनर्गठण, तीन शेतीशी निगडित कर्जाच्या वसुली स्थगिती ,चार कृषी पंपाच्या चालू वीज बिलाच सूट 7.5 अश्व शक्तीच्या पऱ्यांच्या वीज पंपांचे बिल अगोदरच माप आहे त्यावरील क्षमतेच्या पंपांनाही सूट लागू असेल, पाच शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, सहा रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाच्या निकषात शिथिलता आणून जास्तीत जास्त कामे सुरू करणे, सात आवश्यक तिथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकर चा वापर, आठ टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे , नऊ शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकरी आणि मजुरांना अन्नधान्याची टंचाई भासणार नाही याची व्यवस्था करणे, दहा जनावरांना आवश्यक चारा उपलब्ध करून देणे ,अकरा जलसंधारणाची कामे सुरू करणे, बारा अगोदर निर्गमित केलेल्या शासन निर्देशाप्रमाणे त्याचे पाणी आणि जनावरांसाठी पाण्याची नियोजन करणे .या दरम्यान पुरंदर तालुक्यात तातडीने पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले असून, पिकाच्या नुकसानीची मदत स्वतंत्र आदेशाने जाहीर होणार आहे.

Image

पुरंदर तालुक्यातील सासवड येथील गणपती विसर्जनाच्या दिवशीच निलेश मेडिकल मध्ये पाच युवकांची एका युवकाला बेदम मारहाण सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड तालुका पुरंदर येथील गावच्या हद्दीमधील होले बिल्डिंग मेन रोड येथील निलेश मेडिकल मध्ये गणपती विसर्जनाच्या दिवशीच रात्री 11:45 वाजताच्या सुमारामध्ये गावच्या हद्दीतील होले बिल्डिंग मेन रोड येथील निलेश मेडिकल मधील एक आशिष राऊत, दोन अनुज राऊत यांनी शर्टची कॉलर पकडून लाथा बुक्क्याने मारहाण केली त्यावेळी तीन शैलेश राऊत, चार महेश राऊत, पाच ओंकार विजय राऊत यांनी मेडिकल मध्ये येऊन लाकडी काठ्याने मेडिकल मधील सामानाची तोडफोड करून साधारण 1,50,000 रुपयाचे नुकसान केलेले आहे, त्याचे हातातील काठीने तसेच भाऊ प्रसाद होले यांना सुद्धा मारहाण केली व आत्या व दोन बहिणींना शिवीगाळ करून, दमदाटी केली म्हणून पाच जणांविरोधामध्ये तक्रार ही फिर्यादी प्रतीक सुहास होले वय 24 वर्ष व्यवसाय नोकरी राहणार होले बिल्डिंग मेन रोड सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे यांनी सासवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे ,सासवड पोलीस स्टेशन गु रजिस्टर नंबर 475/ 2026 भारतीय न्याय सविता कलम 189(2 ),190,, 191(2), 118( 1), 115(2), 352, 351(2 )(3),324 (5 )नुसार सासवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे. सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या अधिपत्याखाली पुढील तपास पोलिस हवालदार बापू गायकवाड हे करीत आहेत.

Image