Posts

वाघीरे महाविद्यालयात अविष्कार स्पर्धेच्या उद्बोधन वर्गाचे आयोजन सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वाघीरे महाविद्यालय, सासवड येथे अविष्कार स्पर्धेच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांसाठी उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगीडॉ. प्रशांत साठे यांनी ‘अनुभव, ज्ञान आणि अविष्कार स्पर्धेचे विषय’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना डॉ. प्रशांत साठे यांनी अनुभव, निरीक्षण, ज्ञान आणि संशोधन यांचा परस्परसंबंध स्पष्ट केला. विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनातील समस्या ओळखून त्यावर नाविन्यपूर्ण उपाय शोधावेत. अनुभवातून मिळणाऱ्या ज्ञानाचा उपयोग संशोधन व नवकल्पनांच्या निर्मितीसाठी करावा, असे त्यांनी सांगितले. अविष्कार स्पर्धा ही विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संशोधनवृत्ती विकसित करणारे महत्त्वाचे व्यासपीठ असल्याचे त्यांनी नमूद केले.अविष्कार स्पर्धेसाठी विषय निवडताना त्यातील नावीन्य, सामाजिक उपयुक्तता, व्यवहार्यता आणि संशोधनाची शक्यता यांचा विचार करणे आवश्यक आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, वाणिज्य, व्यवस्थापन, सामाजिक शास्त्रे, पर्यावरण, भाषा आणि साहित्य अशा विविध क्षेत्रांतील समस्यांचा अभ्यास करून विद्यार्थ्यांनी संशोधनात्मक विषय निवडावेत, असे आवाहन त्यांनी केले.प्रकल्प तयार करताना विषयाची निवड, उद्दिष्टे, माहिती संकलन, निरीक्षण, प्रयोग, विश्लेषण आणि निष्कर्ष यांना महत्त्व द्यावे. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनांना कृतीची जोड देऊन समाजोपयोगी आणि नाविन्यपूर्ण प्रकल्प साकारावेत, असेही डॉ. साठे यांनी सांगितले. संशोधनामध्ये मौलिकता, चिकित्सक विचार आणि शास्त्रीय दृष्टिकोन आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे होते. उद्बोधन वर्गात प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी विद्यापीठ स्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या अविष्कार स्पर्धेचे महत्त्व व उपयुक्तता याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या सर्जनशीलतेला, संशोधनवृत्तीला आणि नवकल्पनांना चालना देण्यासाठी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. अविष्कार स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास होऊन त्यांच्या संशोधनाला योग्य व्यासपीठ मिळते, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी सेठ गोविंद सेठ साबळे फार्मसी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. राजश्री चव्हाण, उपप्राचार्य डॉ. संजय झगडे, आयक्यूएसी समन्वयक डॉ. बजरंग शिंदे, वाणिज्य विभागाचे समन्वयक डॉ. एन. एस. गिरी, विज्ञान विभागाचे समन्वयक डॉ. सचिनकुमार शहा आणि ए.आर.सी. समन्वयक डॉ. संदीप राठोड उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विद्या पाटणकर यांनी केले, तर आभारप्रदर्शन डॉ. किशोर लिपारे यांनी मानले. या उद्बोधन वर्गास महाविद्यालयातील विभागप्रमुख, सहकारी प्राध्यापक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना अविष्कार स्पर्धेतील विषय निवड, संशोधनाची दिशा आणि प्रकल्प सादरीकरणाबाबत उपयुक्त मार्गदर्शन मिळाल्याने हा उपक्रम उत्साहात संपन्न झाला.

Image

पुरंदर तालुक्यामधील 72 ग्रामपंचायतीवरील सरपंच प्रशासक अधिकार रद्द ; तर यापुढे शासकीय अधिकारी प्रशासक सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यामधील ग्रामपंचायत मुदत संपलेल्या सरपंच प्रशासक म्हणून केलेल्या नेमणूक पुणे जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी यांनी शासकीय निर्णयानुसार रद्द केली असून, यापुढे शासकीय अधिकारी प्रशासक म्हणून काम पाहतील असा निर्णय दिलेला आहे, पुणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एक महत्त्वाचा आदेश जारी केला असून, पुरंदर मधील मुदत संपलेल्या 72 ग्रामपंचायतीवरील प्रशासक म्हणून सरपंच यांच्याकडे असलेले अधिकार संपुष्टात आणले असून, ज्या ग्रामपंचायतीची निवडणूक संपली असून, निवडणूक घेण्यात आलेल्या नाहीत अशा ग्रामपंचायतीमध्ये प्रशासक म्हणून विस्तार अधिकारी यांची निवड करण्यात आली आहे. अन्य शासकीय अधिकारी प्रशासक म्हणून काम पाहतील हा आदेश महाराष्ट्र शासन राजपत्रात अधिसूचना करण्यात आली पासून सहा महिने कालावधीसाठी किंवा ग्रामपंचायत स्थापनेपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तोपर्यंत आदेश लागू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. अशी माहिती प्रतिनिधीला दिलेली आहे.

Image

शालेय फुटबॉल स्पर्धेत शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलचे दैदिप्यमान यश! १४ वर्षे वयोगटात द्वितीय क्रमांक पटकावत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड; १७ वर्षे वयोगटात तृतीय क्रमांक सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड, दि. ११ सप्टेंबर २०२६ :श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, सासवड संचलित शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, सासवडच्या विद्यार्थ्यांनी दिवे येथे दि.१० सप्टेंबर २०२६ रोजी पार पडलेल्या शालेय क्रीडा स्पर्धेतील तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला. १४ वर्षे वयोगट मुले, तनिष्क योगेश घोरपडे,बालकृष्ण बलाराम जोशी,सार्थक महादेव शिंदे,शौर्य बाबुराव चोरघे,आरुष अमोल जगताप,शिवराज गुरुशांत स्वामी,श्लोक प्रवीण लोळे,प्रथमेश गणेश लडकत,अर्णव प्रशांत पवार,सुयश लक्ष्मण लाड,अर्णव अशोक काळभोर,सात्विक दत्तात्रय शिंदे,ओम कल्पेश म्हेत्रे,विवेक कुवरसिंग वळवी,अर्णव भास्कर कोलते या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत द्वितीय क्रमांक पटकावला असून, या शानदार कामगिरीच्या जोरावर संघाची जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विद्यार्थ्यांनी संपूर्ण स्पर्धेत सांघिक भावना, शिस्त, आत्मविश्वास आणि उत्कृष्ट क्रीडाकौशल्याचे दर्शन घडविले. तसेच १७वर्षे वयोगटातील मुलांच्या संघानेही दमदार खेळ करत तृतीय क्रमांक मिळविला. दोन्ही संघांच्या या यशामुळे विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील उज्ज्वल परंपरेत आणखी एक मानाचा अध्याय जोडला गेला आहे. या यशासाठी क्रीडा शिक्षक संतोष गलांडे यांनी विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण मार्गदर्शन, सराव व योग्य प्रशिक्षण दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी मेहनत, शिस्त आणि संघभावनेच्या जोरावर हे यश संपादन केले.या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेच्या अध्यक्षा आनंदीकाकी जगताप, संस्थेचे सचिव संजय जगताप, संस्थेचे संस्थापक सचिव व विश्वस्त डॉ.एम.एस. जाधव सहसचिव दत्तात्रय गवळी, व्यवस्थापक कानिफनाथ अमराळे,रवींद्रपंत जगताप व विद्यालयाचे प्राचार्य डॉ.अभिजीत टकले,उपप्राचार्य सुषमा रासकर ,यांनी यशस्वी विद्यार्थी, क्रीडा शिक्षक व सर्व संबंधित शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या

Image

सासवड येथे झालेल्या श्रावण सखी महोत्सवात तालुकास्तरीय मंगळागौर स्पर्धेत कोडीतच्या श्रीनाथ जोगेश्वरी महिला ग्रुपने प्रथम क्रमांक पटकावला सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: मंगळागौर स्पर्धेतीलद्वितीय क्रमांक बाळोबानाथ ग्रामसंघ सुपे संघाने पटकावत तसेच उत्तेजनार्थ म्हाळसा ग्रुप जेजुरी यांना मिळाला.ही सर्व बक्षीसे शिवसेनेच्या जिल्ह्याच्या नेत्या ममता शिवतारे, उपजिल्हा प्रमुख वैशाली काळे, तालुका प्रमुख ज्योती झेंडे यांच्या हस्ते देण्यात आली. या वेळी मनिषा जाधव, उषा पवार, अलका बडदे, प्रियंका सुकल, दिपाली भोराडे कोमल थोपटे, नगरसेविका शिल्पा जगताप, विद्या टिळेकर, दिपाली जगताप, माधुरी राऊत, हेमलता इनामके, रत्ना म्हेत्रे, अस्मिता रणपिसे, फुरसुंगी नगरसेविका राणी हरपळे, विशाखा हरपळे, उषा ढमाळ, मोनिका पवार, शारदा भाडळे आदी महिला उपस्थित होत्या. सुत्रसंचालन रश्मी बोराटे यांनी केले.फोटो : सासवड (ता. पुरंदर ) येथे तालुकास्तरीय मंगळा गौरी स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचा विजयी संघ

Image

पुरंदरच्या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाला कुंभारवळणच्या ७० ते ८० शेतकऱ्यांचा विरोध धनदाडगया दलाल व्यापारयाना दाखले कुणी दिले? सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: “सरकारने प्रत्यक्ष संवाद साधल्याशिवाय एक इंचही जमीन देणार नाही”; शेतकऱ्यांचा इशारा, मोठ्या आंदोलनाची तयारी, लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांना विश्वासात घेतले नाही असा शेतकऱ्यांचा आरोप धनदाडगयाना, व्यापारी,दलाल यांना शेतकरी असल्याचेदाखले कुणी दिले बागायती भागातील जिरायती दर्जा हे पाप नक्की कुणाचे? विमानतळाला विरोध नाही तर शेतकरी यासोबत जमीन मूल्याकन सरकारने अधिकारी वगॅ यांनी बातचीत केली नाही तर एजंट दलाल याच्याशी बातचीत केली. म्हणुन विमानतळ होऊन देणार नाही लढा पुढे चालू आहे यावर निणॅय अवलंबून आहे. असे शेतकरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कुंभारवळण, ता. पुरंदर : पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर कुंभारवळण येथील सुमारे ७० ते ८० शेतकऱ्यांनी विमानतळासाठी जमीन देण्यास ठाम विरोध दर्शविला आहे. एका वृत्तपत्रात डिसेंबरअखेरपर्यंत विमानतळाचे प्रत्यक्ष काम सुरू होणार असल्याच्या आशयाची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर ग्रामस्थांनी एकत्र येत या वृत्ताचा निषेध केला. कुंभारवळण परिसरातील जवळपास ३३० एकर जमीन सध्या शेतकऱ्यांच्या ताब्यात असून, या जमिनीबाबत सरकारला जमीन देण्याची कोणतीही परवानगी अथवा संमतीपत्र शेतकऱ्यांनी दिलेले नसल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण झालेली नसताना विमानतळाचे काम सुरू करण्याच्या बातम्या कशाच्या आधारे प्रसिद्ध होत आहेत, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला.दरम्यान, विमानतळाच्या प्रस्तावित क्षेत्रातील जमिनींच्या व्यवहारांबाबतही शेतकऱ्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. बाहेरील व्यक्ती, दलाल अथवा एजंट यांच्या माध्यमातून जमिनींचे व्यवहार झाले असतील, तर त्या जमिनींना शेतकरी दाखला कसा मिळाला? तसेच जिरायती जमिनींना बागायती किंवा इतर दर्जा देऊन शासनाची दिशाभूल करून अधिक मोबदला घेण्यात आला आहे का, याची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. A1 म्हणजे विमानतळ जागा दुसरी आहे a5 कुंभारवळण जागा विमानतळ बाधित शेतकरी संदर्भात योग्य नाही कारण पीएम आरडी मध्ये येत असून येथील बागायती भागातील 94%जमीन आहे.विमानतळ बागायती भागातील करता येत नाही असा अहवाल सक्तीने जमीन संपादित करता येतयेत नाही असेही शेतकरी कुंभारवळण येथील गणेश काशिनाथ मोरे यांनी सांगितले.“पुरंदर उपसा सिंचनामुळे सुफलाम झालेल्या जमिनीवर प्रत्यक्ष शेतकरी काबाडकष्ट करीत आहे. अशा जमिनींचा दर्जा चुकीचा दाखवून शेतकऱ्यांच्या हक्कावर गदा आणण्याचा प्रयत्न कोण करीत आहे?” असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.प्रस्तावित विमानतळासाठी सुमारे साडेतीन हजार एकर क्षेत्राचा प्रकल्प असल्याचे सांगितले जात असून, सात बाधित गावांमधील शेतकऱ्यांमध्ये विविध बातम्या आणि दावे प्रसिद्ध करून संभ्रम निर्माण केला जात असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला.“आम्ही एकही इंच जमीन सरकारला देणार नाही. सरकारने आमच्याशी प्रत्यक्ष संवाद साधून आमच्या मागण्या आणि प्रश्नांवर चर्चा केल्याशिवाय विमानतळासाठी जमीन देण्याचा प्रश्नच नाही,” असा ठाम निर्धार कुंभारवळणच्या शेतकऱ्यांनी व्यक्त केला.शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पुरंदर तालुकाध्यक्ष अभिजीत जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांनी सरकारला इशारा दिला आहे. मनसेचे राज ठाकरेंचा माध्यमातून सुध्दा प्रयत्नही करणार असल्याचे शेतकरी गणेश काशिनाथ मोरे यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास भविष्यात मोठे आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा अभिजीत जगताप, गणेश काशिनाथ मोरे व उपस्थित शेतकऱ्यांनी दिला.विमानतळ प्रकल्पाबाबत शासनाची नेमकी भूमिका काय आहे, जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया कोणत्या टप्प्यावर आहे आणि जमिनींच्या व्यवहार व जमिनीच्या वर्गीकरणाबाबत करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी होणार का, याकडे आता पुरंदर तालुक्याचे लक्ष लागले आहे.“जमीन घेतलीच नाही, मग विमानतळाचे काम कसे सुरू करणार?”; कुंभारवळणच्या ८० शेतकऱ्यांचा सरकारला थेट सवाल केला आहे.

Image

वाघीरे महाविद्यालयात रोजगार मेळाव्याचे आयोजन सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वाघिरे महाविद्यालय, सासवड येथील वाणिज्य विभाग, प्लेसमेंट विभाग आणि अभिष्का सोल्युशन्स, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांसाठी बँकिंग आणि फायनान्स या क्षेत्रातील विविध रोजगार संधींबाबत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लातूर सहकारी बँकेचे क्षेत्रीय अधिकारी श्री अभिजीत सावंत आणि अभिष्का सोल्युशन्स, प्लेसमेंट सेंटर पुणे येथील प्रतीक्षा गावडे यांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेत सदस्य आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, वाणिज्य विभागाचे समन्वयक डॉ.नरसिंग गिरी,वाणिज्य विभागप्रमुख डॉ. किशोर लिपारे, प्लेसमेंट सेलचे समनव्यक प्रा. दिपक लोखंडे, प्रा. शुभम एक्के आणि वाणिज्य, बीबीए व बीसीए विभागातील 132 विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अभिजीत सावंत यांनी पुणे व परिसरातील बँकिंग आणि फायनान्स क्षेत्रामधील विविध रोजगारांच्या संधी आणि त्यासाठी आवश्यक कौशल्य व पात्रता व मुलाखतीसाठी आवश्यक बाबींचे विश्लेषण केले. त्यानंतर आपल्या अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या संधीचे सविस्तर विश्लेषण केले. बदलत्या काळानुसार व तंत्रज्ञानानुसार वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना अनेक क्षेत्रांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत पण त्यासाठी विद्यार्थ्यांनी आवश्यक कौशल्य व पात्रता धारण केली पाहिजे यासोबतच नवीन तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे असे प्रतिपादन केले. यावेळी त्यांनी मुलाखतीसाठी आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यानंतर पार पडलेल्या मुलाखत प्रक्रियेमध्ये वाणिज्य शाखेतील 52 विद्यार्थ्यांची प्रथम फेरीतून दुसऱ्या फेरीसाठी निवड करण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक डॉ.किशोर लिपारे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. नरसिंग गिरी यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन वाणिज्य विभाग व प्लेसमेंट अधिकारी अभिजीत सावंत वाणिजय विभाग प्रमुख किशोर लिपारे,प्रतिशा गावडे विभागाने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे केले. यासाठी वाणिज्य विभागातील सर्व प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी संतोष लोणकर, शैलेश राऊत व गणेश खोडके यांचे सहकार्य लाभले.

Image

श्रावणी अमावस्येनिमित्त श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थानात भाविकांची गर्दीदर्शनासाठी विशेष नियोजन; अन्नदान महाप्रसादाचे आयोजन सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: वीर, ता. पुरंदर, श्रावणी अमावस्येनिमित्त वीर येथील प्रसिद्ध श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थानात भाविकांनी मोठी गर्दी केली. पहाटेपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग लागली होती. दूरवरून आलेल्या भाविकांनी श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांचे दर्शन घेतले. गुरुवार व शुक्रवार दोन्ही दिवशी भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने विशेष नियोजन करण्यात आले होते. मंदिर परिसरात भाविकांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह, अतिरिक्त कर्मचारी तसेच दर्शन रांगेचे योग्य नियोजन करण्यात आले होते. गर्दीचे नियंत्रण व भाविकांना शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घेता यावे यासाठी होमगार्डची नियुक्ती करण्यात आली असल्याचे मुख्य विश्वस्त मोहनराव धुमाळ यांनी सांगितले. श्रावणी अमावस्येनिमित्त भाविकांसाठी अन्नदान महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. या अन्नदानासाठी अन्नदाते नेताजी बबुराव धुमाळ (वाडकर परिवार) यांचे सहकार्य लाभले. भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. दिवसभर मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. भाविकांच्या वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर देवस्थान प्रशासनाने केलेल्या नियोजनामुळे दर्शन व्यवस्था सुरळीतपणे पार पडली.यावेळी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त सुनील धुमाळ व सर्व सहकारी उपस्थित होते.

Image