Skip to main content
जैव-एन्झाईम निर्मितीच्या प्रात्यक्षिकातून विद्यार्थ्यांना शाश्वत विकासाचा संदेशएसएनडीटी पुणे कॅम्पसमध्ये १८० हून अधिक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: शाश्वत विकास, पर्यावरण संवर्धन, कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरणपूरक जीवनशैली याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने एसएनडीटी महिला विद्यापीठ, पुणे कॅम्पस येथील MKKRC Library मध्ये जैव-एन्झाईम निर्मिती प्रात्यक्षिक व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास १८० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले.हा उपक्रम ध्यास पूर्वा फाउंडेशन, PCSR भूगोल विभाग, NSS युनिट – एसएनडीटी कॉलेज ऑफ होम सायन्स, पुणे, मानव पर्यावरणशास्त्र व समुदायशास्त्र विभाग, एसएनडीटी कॉलेज ऑफ होम सायन्स, पुणे, ज्युनिअर कॉलेज ऑफ एसएनडीटी कॉलेज ऑफ होम सायन्स, पुणे, MKKRC Library, SNDT Pune आणि सृष्टी फाउंडेशन, मेगा सिटी, कोथरूड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला.कार्यक्रमात भूगोल विभागाच्या प्रमुख प्रा. रत्नप्रभा जाधव यांनी जैव-एन्झाईम/ग्रीन बायो-एन्झाईम तयार करण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना करून दाखविले. आवश्यक साहित्य विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आणि विद्यार्थ्यांनी स्वतः जैव-एन्झाईम तयार करून या उपक्रमाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.यावेळी विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात पर्यावरणपूरक व शाश्वत उत्पादनांचा वापर करण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. जैविक कचऱ्याचा योग्य वापर, कचरा कमी करणे, पर्यावरणाचे संवर्धन आणि शाश्वत जीवनशैलीचा स्वीकार याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ललिता भगत, NSS कार्यक्रम अधिकारी, एसएनडीटी कॉलेज ऑफ होम सायन्स, पुणे तसेच मानव पर्यावरणशास्त्र व समुदायशास्त्र विभागाच्या प्रमुख यांनी केले.कार्यक्रमास डॉ. गणेश चव्हाण, कॅम्पस प्रभारी, एसएनडीटी महिला विद्यापीठ, पुणे कॅम्पस तथा प्राचार्य, एसएनडीटी कॉलेज ऑफ होम सायन्स, पुणे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.तसेच डॉ. अंजली कदम, एसएनडीटी NSS पुणे झोनल समन्वयक तथा एसएनडीटी आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज फॉर वुमेन, पुणेच्या माजी प्राचार्या, यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी पर्यावरणपूरक जीवनशैलीचे महत्त्व अधोरेखित करत दैनंदिन जीवनात शाश्वत पद्धतींचा अवलंब करण्याचे आवाहन केले.त्याचबरोबर फाउंडेशनचे अध्यक्ष श्री हेमंत पाटील सर तसेच लायब्ररीचे प्रमुख डॉ. विलास जाधव सर,सृष्टी फाउंडेशन, मेगा सिटी, कोथरूड यांच्या वतीने श्री. संदीप मोकाटे, श्री. ओम मोकाटे तसेच युवक मंडळातील सदस्य उपस्थित होते. त्यांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाची केवळ माहितीच मिळाली नाही, तर कृतीतून शिकण्याचा अनुभव मिळाला. जैव-एन्झाईम तयार करण्याच्या प्रत्यक्ष प्रात्यक्षिकामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जबाबदारीची भावना निर्माण झाली असून, शाश्वत व पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, “शाश्वत विकासासाठी कृतीतून पर्यावरण संवर्धन” हा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment