Skip to main content
शेठ गोविंद रघुनाथ साबळे महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शेठ गोविंद रघुनाथ साबळे कॉलेज ऑफ फार्मसी अँड पॉली, सासवड येथे भारताचे माजी राष्ट्रपती व महान शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त ५ सप्टेंबर २०२६ रोजी शिक्षक दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जयश्री नाळे यांनी केले. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. राजश्री चव्हाण, उपप्राचार्या डॉ. स्मिता पवार, पॉलिटेक्निक विभागाच्या प्राचार्या व्ही. एस. गायकवाड, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत मनोगते व भाषणे सादर केली. उपप्राचार्या डॉ. स्मिता पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना यशस्वी जीवनासाठी सकारात्मक दृष्टिकोन, शिस्त, आत्मविश्वास, चांगले संस्कार व मूल्यांची जोपासना करण्याचे आवाहन केले.प्राचार्या डॉ. राजश्री चव्हाण यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी जीवनात धैर्य, ध्येय आणि दृढनिश्चय बाळगून यशस्वी वाटचाल करावी. तसेच पर्यावरणप्रेम जपत सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. किरण आर. रणदिवे, प्राध्यापक व विभागप्रमुख, वनस्पतीशास्त्र विभाग, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब मगर महाविद्यालय, महादेवनगर, हडपसर यांचा परिचय प्रा. दीपली जगताप यांनी करून दिला. डॉ. रणदिवे यांनी शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षणासोबत संस्कार, मूल्ये, सामाजिक जाणीव आणि जबाबदारी यांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना जीवनात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून ध्येयाकडे वाटचाल करण्याची प्रेरणा मिळाली.यावेळी शिक्षक तसेच विद्यार्थी-शिक्षकांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती आदर व कृतज्ञता व्यक्त करून त्यांच्या ज्ञानदानाच्या कार्याचा गौरव केला.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सांस्कृतिक विभाग, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचा समारोप सौ. पायल पाटसकर यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.ज्ञान, संस्कार आणि मूल्यांच्या माध्यमातून सक्षम व जबाबदार पिढी घडविणाऱ्या शिक्षकांच्या योगदानाचा गौरव करत शिक्षक दिनाचा हा प्रेरणादायी सोहळा उत्साहात संपन्न झाला.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment