Skip to main content
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त सासवड येथे रांगोळी स्पर्धेचे आयोजन सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शेठ गोविंद रघुनाथ साबळे कॉलेज ऑफ फार्मसी अँड पॉली, सासवड येथे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. संस्थेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ७ सप्टेंबर २०२६ रोजी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. राजश्री चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपप्राचार्या डॉ. स्मिता पवार, पॉलिटेक्निक विभागाच्या प्राचार्या प्राध्यापक विशाखा गायकवाड, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे संस्थापक मा. बाबुरावजी घोलप साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर रांगोळी स्पर्धेच्या परीक्षणास सुरुवात करण्यात आली. स्पर्धेसाठी शिक्षणाचे भविष्य : पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, मा. बाबुरावजी घोलप साहेब आणि मा. अजितदादा पवार साहेब’ हा विषय देण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी आपल्या कलात्मक कौशल्याचा व सर्जनशीलतेचा उत्कृष्ट आविष्कार रांगोळीच्या माध्यमातून साकारला.रंग, कल्पकता, सामाजिक संदेश आणि संस्थेच्या शैक्षणिक कार्याचा सुंदर संगम साधणाऱ्या विविध रांगोळ्यांनी परिसर आकर्षक व उत्साहपूर्ण बनला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. प्राध्यापक पूजा पिसाळ यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.संस्थेच्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक वाटचालीचा गौरव करणाऱ्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळाले, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment