Skip to main content
वाघीरे महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे वाघीरे महाविद्यालय, सासवड येथे भारताचे माजी राष्ट्रपती, महान तत्त्वज्ञ व शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे डॉ. नितीन घोरपडे होते.षकार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शिक्षक दिनाचे महत्त्व विशद करताना मान्यवरांनी शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांचे योगदान, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासातील शिक्षकांची भूमिका आणि बदलत्या काळातील शिक्षणव्यवस्थेतील शिक्षकांची जबाबदारी याविषयी मार्गदर्शन केले.अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा घटक नसून विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देणारा मार्गदर्शक असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांमध्ये मूल्ये, संवेदनशीलता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सामाजिक बांधिलकी निर्माण करण्यामध्ये शिक्षकांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले.कार्यक्रमास फार्मसी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. राजश्री चव्हाण, उपप्राचार्य डॉ. संजय झगडे, समन्वयक डॉ. नरसिंह गिरी, कार्यालय प्रमुख रवी जाधव, सर्व विभाग प्रमुख, सहकारी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. किरण गाढवे तर आभार डॉ सुवर्णा खोडदे यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनामुळे महाविद्यालय परिसरात शिक्षक दिनाचे उत्सवी व प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment