सासवडमध्ये कृष्णलीला दहीहंडी उत्सवाचा जल्लोष भोईराज गोविंदा पथक , भोरने पाचव्या थरावर दहीहंडी फोडत साधला थरारक विजय सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड शहरातील सर्वात मोठा आणि आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला कृष्णलीला दहीहंडी उत्सव २०२६ मोठ्या उत्साहात, जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. कृष्णलीला दहीहंडी उत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यास सासवड शहरासह संपूर्ण पुरंदर तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.दहीहंडीचे विधिवत पूजन युवा नेते गौरव कोलते, सासवड नगरपालिकेचे माजी नगरसेवक राजेंद्र गिरमे, राजेंद्र दादा भांडवलकर आणि अठरा पगड बारा बलुतेदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब भांडवलकर यांच्या हस्ते करण्यात आले.या उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरले ब्लॅक क्वीन मिनू कोल्हापूरकर. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमात विशेष रंगत आली. दरम्यान, भोईराज दहीहंडी संघ, भोर यांनी उत्कंठावर्धक खेळाचे प्रदर्शन करत अखेर पाचव्या थरावर दहीहंडी फोडून विजय मिळवला. दहीहंडी फुटताच उपस्थितांनी एकच जल्लोष करत ‘गोविंदा आला रे आला’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून सोडला.या भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन रूतिक भाऊ भांडवलकर, प्रशांत भाऊ यादव, एम.डी. उर्फ महेश दडस, सोनू शेठ जाधव, साहिल भाऊ चौरे, जुनेद भाई आतार, जगदीश भाऊ भोंडे, शानू भाई पठाण, अभिजीत दादा जगताप, अजय दादा पवार, सोहेल भाई शिकलकर, अदनाद भाई आतार, अनिकेत भाऊ भोंडे, तुषार शेठ ताम्हणे, वैभव दादा कोलते आणि ओंकार शेठ कामठे यांनी केले.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष वामन जगताप, परिवर्तन क्रांती सेनेचे संस्थापक अमोल लोंढे, अठरा पगड बारा बलुतेदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट पश्चिम महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नारायण जाधव, अध्यक्ष राहुल भोंडे, विद्यमान नगरसेवक प्रदीप राऊत, सासवड नगरपालिकेचे शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब भिंताडे ,उद्योजक जितेंद्र पवार, पुणे जिल्हा भाजपचे अध्यक्ष साकेत जगताप, उद्योजक शक्ती धिवार, भाजप शहर अध्यक्ष आनंद जगताप, उद्योजक शुभम शेठ जगताप, शिवसेना सासवड शहर प्रमुख मिलिंद भैय्या इनामके, युवा नेते अक्षराज जगताप, युवा नेते सागर दादा मोकाशी, युवा नेते अंकुर दादा शिवरकर, सासवड शहर भाजपचे अध्यक्ष मयूर शेठ महागावकर,अठरा पगड बारा बलुतेदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य मार्गदर्शक दिलीप गुरव, महाराष्ट्र राज्य युवक अध्यक्ष दत्तात्रय सूर्यवंशी, हॉटेल सवईचे डायरेक्टर अजित शेठ गोळे, परिवर्तन क्रांती सेना पुरंदर तालुका अध्यक्ष अक्षय भैय्या खवले,पुरंदर तालुका अध्यक्ष राहुल दादा पवार, अभिजित शेठ धुमाळ,आणि अभिषेक पवार यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.दहीहंडीच्या थरारक क्षणांना नागरिकांनी मोठ्या उत्साहाने दाद दिली. ढोल-ताशांचा गजर, गोविंदांच्या घोषणा, कृष्णनामाचा जयघोष आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण सासवड शहराचे वातावरण कृष्णमय झाले होते.या भव्य सोहळ्याच्या निमित्ताने सासवडकरांसह पुरंदर तालुक्यातील नागरिकांना एकत्र आणत कृष्णलीला दहीहंडी उत्सव समितीने सामाजिक आणि सांस्कृतिक एकतेचा संदेश दिला.“गोविंदा आला रे आला…कृष्णाच्या नामाचा जयघोष झाला!”या भव्य दहीहंडी सोहळ्यातील उत्साह, जल्लोष आणि अविस्मरणीय क्षण छायाचित्रांच्या माध्यमातून कायम स्मरणात राहतील.

Comments

Popular posts from this blog

एजंट (दलाल )इन्वेस्टर बहिणीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदर मध्ये उभारणीसाठी अधिकारी पुढारी यांच्या संगणमताने तयारी ; परंतु दस्तर खुद्द शेतकरी सात गावातील जमीन न देण्याचा निर्धार सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: आंतरराष्ट्रीय विमानतळ संदर्भात प्रामुख्याने प्रशासकीय इमारतीमध्ये अक्षरशा :एजंट (दलाल )यांचा सुळसुळाट झालेला आहे ,पुरंदर तालुक्यात विमानतळ संदर्भात या एजंट (दलाल)यांनी अधिकारी यांच्या नावाखाली काही ठिकाणी शेतकऱ्याला ,महिलांना एजंट दलाल यांनी पूर्णपणे वेठीस धरलेले आहे ,अधिकारी यांच्या नावाखाली काही गुंठे जमीन एजंट (दलाल) मागत आहेत अधिकारी यांचे नाव सांगून निकाल करुन घेत असताना दोन लाख रुपयांपर्यंत अधिकारी याच्यानुसार शेतकऱ्याकडून करत आहेत, विमानतळ साठी संमती शेतकरी आणतो असे सांगून तर सर्वसामान्य शेतकरी यांना वेटीस धरत आहे, काही विमानतळ भागात झाडे, झुडपे शेड वगैरे नोंदी खोट्या असलेल्या अधिकारी वर्गाकडून लावून घेतलेल्या आहेत, विमानतळ संदर्भात 15 ते 20 एजंट (दलाल)आहेत अधिकारी वर्गापाशी अक्षरशा:असून तासनतास आत मध्ये गप्पा टप्पा चाललेल्या असतात या एजंट (दलाल) वर फौजदारी गुन्हे दाखल करावेत सर्वसामान्य शेतकऱ्याला अधिकारी यांच्या पाशी पाच मिनिट सुद्धा वेळ मिळत नाही , एजंट (दलाल) मुळे सर्व सामान्य शेतकरी यांची कामे होत नाहीत, तर एजंट (दलाल) यांची कामे होतात अधिकारी वर्ग लोकसेवक आहेत, तर एजंट( दलाल) यांना का ? वेळ दिला जातो सर्वसामान्य शेतकरी यांना कमीत कमी पाच मिनिट वेळ तरी लोकसेवक अधिकारी वर्गाने द्यावा, म्हणजेच सर्वसामान्यांची कामे होतील व एजंट (दलाल )वकील यांना एक प्रकारे चांगलाच लगाम लागेल मोचके पुरंदर मधील वकील सुद्धा त्यामध्ये सामील आहेत, अधिकारी वर्गापाशी तासूनतास आत मध्ये गप्पा मारत असतात तर सर्वसामान्य शेतकरी यांचे काम होत नाही ,विमानतळ संदर्भात तालुक्यातून कामासाठी हेलपाटे मारत असतात ,लिफ्ट कित्येक दिवस बंद आहे ,त्यावर निर्णय होत नाही ,जेष्ठ नागरिक ,महिला दिव्यांग यांचे हाल होत आहेत, एखादा जिन्यावरून जाताना चक्कर येऊन पडल्यावरच का ? प्रशासन लक्ष देणार का? प्रामुख्याने अधिकारी वर्गाने पुरंदर मधील विमानतळ एजंट (दलाल) बहिणींच्या इन्वेस्टर यांच्या जोरावर विमानतळ चा जो काही घाट घातलेला आहे तो मनसुबा पूर्ण होणार नाही, उदाचीवाडी येथे एका शेतकऱ्याला अधिकारी सांगतो दोन ड्रेस घेतो ,मुलाला मुलीला कामाला लावतो, हा प्रकार अधिकारी वर्गाकडून होत आहे तर एजंट (दलाल )सर्वसामान्य शेतकरी महिला यांना अक्षरशा: काही गुंठे जमीन माझ्या नावावर करा ,बाकी तुम्हाला विमानतळाचे पेमेंट मिळवून देतो, अधिकारी वर्गाचे नाव पुढे करून एजंट (दलाल )हे प्रकार करत आहेत यावर अधिकारी बदनाम होत आहेत त्यासाठी अधिकारी वर्गाने प्रामुख्याने हे जर प्रकार होत असतील तर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, त्यामुळेच सर्वसामान्य शेतकरी यांची कामे होत नाहीत ,त्यामुळे एजंट (दलाल )यांना खुद्द अधिकारी वर्गाने आवरावे वेळ देऊ नये ,तासूनतास एजंट (दलाल) काही वकील यांना वेळ दिला जातो तर लोकसेवक म्हणून अधिकारी वर्गाने पुरंदर मधील सर्वसामान्य शेतकरी तालुक्यातून येतो ,विमानतळ संदर्भात बाकीच्या कामात कमीत कमी पाच मिनिट तरी त्या सर्वसामान्य शेतकऱ्याला वेळ द्यावा व त्याचे काम पूर्ण होईल त्याला पूर्णपणे समाधान मिळेल, सर्वांना एकच न्याय द्यावा ,एजंट (दलाल )काही वकील यांना जास्त वेळ दिल्यामुळे सर्वसामान्य शेतकरी विमानतळ संदर्भात भेटायला आलेल्या तालुका पुरंदर तालुक्यातील वेळेत त्यांची कामे सर्वसामान्य लोकांची होतील तर एजंट (दलाल )बहिणीच्या, इन्वेस्टर पुढारी यांच्या जोरावरच फक्त पुरंदर तालुक्यातील पारगाव, खानवडी ,एखतपुर, मुंजवडी ,वनपुरी ,उदाचीवाडी कुंभारवळण येथे विमानतळ उभारणार का ? तर सर्वसामान्य कट्टर शेतकरी यांच्या निर्णय निर्धार असा आहे की, विमानतळाला जमीन मोजणीला शासनाला परवानगी दिली, तर भूसंपादन विमानतळाला संमती न देण्याचा निर्धार पक्का मोजक्या शेतकरी वर्गाने घेतलेला आहे ,सक्तीने जमीन शेतकऱ्यांची घेता येत नाही ,कुठे आंबेडकर वृत्तांत मध्ये असे लिहिले आहे का ? शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करा, असा अहवाल कुठेच नाही, हुकूमशाही ,दंडूकशाही ,लाठीमार शेतकऱ्यावर करता येत नाही, बागायत क्षेत्र विमानतळाला घेता येत नाही ,एजंट (दलाल) यांचा जो काही प्रकार चाललेला आहे त्यावर पहिले अधिकारी वर्गाने फौजदारी गुन्हे दाखल करावेत, म्हणजे सर्वसामान्यांची पुरंदर मधील कामे सुरळीत चालू होतील ,अशी पुरंदर मधील सर्वसामान्य जनतेची व नागरिकांची मागणी असून, त्या ठिकाणी त्यांनी सविस्तर माहिती प्रतिनिधीला दिली.

पुरंदर तालुक्यातील सासवड हडपसर रोडवरील झेंडेवाडी येथील अपघातातील मयताची ओळख पटवण्याचे एक प्रकारे आवाहन सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड हडपसर रोडवरील अपघाता मधील मयताचीओळख पटवण्यासाठी आव्हान करण्यात आलेले आहे सासवड हडपसर रोडवरील हॉटेल राधाकृष्ण समोरील पुलावर लाल रंगाच्या एक स्ट्रीम मोटारसायकल वरील अज्ञात चालकाचा दुधाच्या टँकरला पाठीमागून धडकून भीषण अपघात झाला या अपघातामध्ये मोटार सायकल चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. मयताची अद्याप ओळख पटलेली नसून, तेच्या नातेवाईकांचा शोध सुरू आहे, नागरिकांनी मयताची ओळख पटवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आलेले आहे. मयताचे वर्णन वय अंदाजे 26 ते 28 वर्ष रंग गोरा ,उंची पाच फूट पाच इंच, केस काळे व लांब दाढी वाढलेली ,ओळख पटवणारी वैशिष्ट्ये उजव्या हाताच्या पोटरीवर संतोष असे गोंदलेले डाव्या हाताच्या दंडावर त्रिशूल गोंधलेले डाव्या हाताच्या पंजावर एस असे गुणलेले , हाताच्या पोटरीवर संतोष लिहिलेले आहे ,पोटावर व छातीवर जुन्या जखमेचे व्रण, अंगावरील कपडे काळया व पिवळ्या रंगाच्या लायनिंग सिम चा शर्ट, निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट ,सदर व्यक्तीची ओळख कोणाला पटत असल्यास किंवा त्याच्या नातेवाईकाबाबत माहिती असल्यास संबंधित पोलीस ठाण्यातील तात्काळ संपर्क साधावा ,असे आवाहन करण्यात आले आहे ही बातमी सोशल मीडिया व व्हाट्सअप ग्रुप वर प्रसारित केल्यास मयताची ओळख पटण्यास मदत होऊ शकते. पोलीस उपनिरीक्षक श्रीराम पालवे 9970612511 पोलीस हवालदार भिवराज शिंदे 9552825273

महाराष्ट्रातील होमगार्ड कायद्यामध्ये तात्काळ दुरुस्ती करून ; होमगार्ड यांना 365 दिवस काम द्यावे! सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: होमगार्ड गुहरक्षक कायद्यामध्ये तात्काळ दुरुस्ती करून त्या ठिकाणी होमगार्ड बांधवांना कायमस्वरूपी 365 दिवस काम द्यावे, या मागणी करता बसव प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. रामलिंग पुराणे यांनी सोमवारपासून आजाद मैदानात आंदोलन सुरू केले आहे, राज्यामध्ये सध्या सुमारे 44 हजार होमगार्ड आहेत, तसेच 11,000 रिक्त जागा असून, सण ,उत्सव काळामध्ये होमगार्ड यांना काम फक्त असते, दिवसाला 1,283 रुपये भत्ता होमगार्ड यांना मिळतो, परंतु हा भत्ता सहा-सहा महिने मिळत नाही, त्यामुळे कायमस्वरूपी 365 दिवस काम द्यावे,सेवा निवृत्तीनंतर होमगार्ड बांधवांना पुढील उदरनिर्वाहासाठी 50 लाखाची आर्थिक मदत द्यावी, पोलीस भरतीमध्ये वयात 38 वर्षापर्यंत सवलत द्यावी, व भरतीमध्ये १५ टक्के कोठा ठेवावा, सेवानिवृत्तीचे वय 58 वरून 60 करण्याची मागणी असल्याचे डॉ. रामलिंग पुराणे यांनी सांगितले आहे, मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आमच्या मागण्यांची जोपर्यंत दखल घेत नाहीत, तोपर्यंत आमचे आंदोलन असेच सुरू राहील, असेही डॉक्टर रामलिंग पुराणे यांनी सांगितले आहे. अशी माहिती प्रतिनिधीला मिळाली आहे.