Skip to main content
वाघिरे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सासवड प्रथम वर्ष बी. व्होक. विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात साजरा सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: दि. ३ सप्टेंबर २०२६ पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे वाघिरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सासवड येथील बी. व्होक. विभाग अंतर्गत कम्प्युटर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, रिटेल मॅनेजमेंट, फूड प्रोसेसिंग अँड टेक्नॉलॉजी या चार विभागाच्या वतीने प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास प्रथम व द्वितीय वर्षाचे एकूण १८० विद्यार्थी उपस्थित होते. सदर संपूर्ण कार्याक्रमचे आयोजन हे द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी केले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे सर उपप्राचार्य डॉ. संजय झगडे सर तर समन्वयक डॉ. नरसिंह गिरी हे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते महाविद्यालयात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे सर यांनी मार्गदर्शन करताना शिक्षणासोबत कौशल्य विकास आणि व्यक्तिमत्त्व विकासाला महत्त्व देण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांना नोकरी करणारे नाही तर रोजगार देणारे व्यवसायिक बना असे मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांचे लक्ष केंद्रित करून उपलब्ध शैक्षणिक व व्यावसायिक संधींचा योग्य उपयोग करावा, असे त्यांनी सांगितले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय झगडे सर यांनी महाविद्यालयातील शैक्षणिक सुविधा, विविध विभाग तसेच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्यास सांगितले तर वाणिज्य विभागाचे समन्वयक डॉ. नरसिंग गिरी यांनी विद्यार्थ्यांना व्यवसायिक अभ्यासक्रमाचे महत्त्व पटवून दिले व त्यानुसार भविष्यकाळात या चार विभागांमार्फत कोणकोणते रोजगार निर्माण होऊ शकतात या संदर्भात त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमास पर्यटन विभाग प्रमुख प्रा. भूतकर एच. व्ही., रिटेल विभाग प्रमुख प्रा. जगदाळे डी. एम.. संगणक विभाग प्रमुख प्रा. समगीर एस. बी., फूड प्रोसेसिंग विभाग प्रमुख प्रा. गायकवाड पी. एच. तसेच बी. व्होक चे सर्व प्राध्यापक काळे पी. एस., प्रा. निगडे एस. व्ही., प्रा. गायकवाड एन. बी., प्रा. शेवते ए. एन., प्रा. भोसले एन. एस., प्रा. झगडे आर. एस., प्रा. गायकवाड सी. आर. आणि प्रा. जानकर एस. आर. उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. स्वाती समगीर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. ज्ञानेश्वर जगदाळे सर यांनी केले. तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे कु. गौरी वाडेकर व कु. निकिता यादव या विद्यार्थिनींनी केले.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment