Skip to main content
बाल विकास मंदिर शाळेत दहीहंडीचा जल्लोष.विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; श्रीकृष्णाच्या वेशभूषेने वाढविली कार्यक्रमाची रंगत सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सासवड येथील बाल विकास मंदिर शाळेत दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. ज्येष्ठ शिक्षिका मंजुषा चोरामले, शारदा यादव यांच्या हस्ते दहीहंडीचे पूजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णाच्या वेशभूषेत तसेच पारंपरिक पोशाखात उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये आनंद, उत्साह आणि संघभावना निर्माण व्हावी, या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात आणि उत्साहपूर्ण वातावरणात दहीहंडीचा आनंद लुटला. ‘गोविंदा आला रे आला’ अशा घोषणांनी शाळेचा परिसर दुमदुमून गेला.दहीहंडी उत्सवामुळे विद्यार्थ्यांना आपल्या भारतीय संस्कृती व परंपरांची ओळख होण्याबरोबरच एकजूट, सहकार्य, शिस्त आणि संघभावनेचे महत्त्व समजले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण व आनंदी वातावरणात पार पडला.शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब बडधे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारिका राऊत यांनी केले.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment