Skip to main content
जेजुरीकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने ‘मल्हार दहीहंडी महोत्सव’ दणदणीत यशस्वी जेजुरी मयूर कुदळे : रक्षाबंधनानिमित्त जेजुरीतील महिला भगिनींसाठी आयोजित करण्यात आलेल्या 'मल्हार दहीहंडी महोत्सवा’ला महिलांसह जेजुरीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आकर्षक पारितोषिके, लकी ड्रॉ आणि उत्साहपूर्ण वातावरणामुळे या महोत्सवाने जेजुरीकरांचे विशेष लक्ष वेधून घेतले.महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या लकी ड्रॉमध्ये ज्युपिटर स्कूटी, गोदरेज फ्रिज, फ्लोअर मिल मशीन, सोन्याची नथ, चांदीचे करंडे आणि पैठणी साडी* यांसह विविध आकर्षक पारितोषिकांचा समावेश होता. त्यामुळे महिला भगिनींमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला.महोत्सवाला झालेली महिलांची भरघोस उपस्थिती आणि जेजुरीकरांची मोठी गर्दी यामुळे संपूर्ण परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते. विशेषतः महिला भगिनींचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा कार्यक्रमाच्या यशाची महत्त्वपूर्ण पावती ठरला.या शानदार आयोजनासाठी पुढाकार घेणारे नगराध्यक्ष जयदिप बारभाई,उपनगराध्यक्ष गणेश निकुडे,वामनतात्या जगताप,सर्व उत्सवप्रमुख,आयोजक तसेच जेजुरी नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक,नगरसेविका* यांचे जेजुरीकरांकडून कौतुक होत आहे.जेजुरीच्या विकासासोबतच सामाजिक,सांस्कृतिक आणि महिला-केंद्रित उपक्रमांना मिळणारा हा प्रतिसाद निश्चितच कौतुकास्पद असून, भविष्यातही अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे, अशी अपेक्षा जेजुरीकरांकडून व्यक्त होत आहे.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment