Skip to main content
श्रावण महोत्सवात महिला शक्तीचा जागरतेजश्री झुरंगे ‘मिस पुरंदर क्वीन सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: भागीरथी लेडीज स्पेशल ड्राय क्लीनर्स, कला सिद्धी नृत्यालय आणि रोटरी क्लब ऑफ पुरंदर-सासवड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘श्रावण महोत्सव २०२६’ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. सलग दुसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवातून महिलांना स्वतःचे कलागुण सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळाले. विविध उपक्रमांच्या माध्यमातून महिला शक्तीचा जागर करण्यात आला.या कार्यक्रमास रश्मी बागल-कोलते तसेच झी मराठीवरील ‘कमळी’ मालिकेतील बालकलाकार क्रिशा काकडे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.महोत्सवात ‘मिस पुरंदर क्वीन २०२६’, ‘मिसेस पुरंदर क्वीन २०२६’ तसेच लहान मुलांसाठी पारंपरिक वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तेजश्री झुरंगे हिने ‘मिस पुरंदर क्वीन २०२६’, तर आरती ठवाळ यांनी ‘मिसेस पुरंदर क्वीन २०२६’चा मान पटकाविला.बालवेशभूषा स्पर्धेत मुलांच्या गटात बालाजीच्या वेशभूषेतील कृष्णा खिलारी याने, तर मुलींच्या गटात कालिका मातेच्या वेशभूषेतील अलंक्रीता सायजू हिने प्रथम क्रमांक मिळविला.यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या डॉ. रेश्मा पवार, डीवायएसपी रश्मी सावंत आणि फार्मसी अभ्यासक्रमात महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळविलेल्या साक्षी टिळेकर यांना मानाचा ‘आदिशक्ती पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.महोत्सवातील लकी ड्रॉमध्ये पाच भाग्यवान महिलांना पैठणी साड्या देण्यात आल्या. तसेच जेजुरी येथील नवदुर्गा महिला मंडळाने मंगळागौरीचे पारंपरिक सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली.स्पर्धेचे परीक्षण स्नेहा संकाये, मनीषा हिंगे आणि ललिता काकडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शुभम जगताप, लीना वढणे, धनश्री वढणे, स्वाती होले, इशा लोखंडे, वैशाली टपळे यांच्यासह सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोरी पवार, स्वानंद लोमटे आणि सपना पवार यांनी केले.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment