Skip to main content
श्रावणानिमित्त सत्यनारायण महापूजा व सांस्कृतिक कार्यक्रमएसएनडीटी वुमेन्स युनिव्हर्सिटी, पुणे कॅम्पस येथे श्रावणानिमित्त सत्यनारायण महापूजा व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : श्रावण महिन्याचे औचित्य साधून एसएनडीटी वुमेन्स युनिव्हर्सिटी, पुणे कॅम्पस येथे बुधवार, दि. ९ सप्टेंबर २०२६ रोजी सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले. या धार्मिक कार्यक्रमात विद्यापीठातील अधिकारी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच एसएनडीटी कॉलेज ऑफ होम सायन्समधील शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.कॅम्पस कोऑर्डिनेटर डॉ. गणेश चव्हाण सर व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते सत्यनारायण महापूजा पार पडली. यावेळी सर्वांच्या सुख, समृद्धी, आरोग्य व कल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली. पूजेनंतर उपस्थितांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.श्रावणोत्सवाच्या निमित्ताने सायंकाळी महिला कर्मचाऱ्यांसाठी पारंपरिक मंगळागौरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांसह विविध मनोरंजनात्मक उपक्रमांमध्ये महिला कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.तसेच पुरुष कर्मचाऱ्यांसाठी ढोल-ताशा पथकाचे वादन आयोजित करण्यात आले. ढोल-ताशांच्या जोशपूर्ण सादरीकरणामुळे संपूर्ण कॅम्पसमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले. यासोबतच पुरुष कर्मचाऱ्यांसाठी विविध मनोरंजनात्मक व मैदानी खेळांचे आयोजन करण्यात आले.या उपक्रमामुळे विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दैनंदिन शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजातून काही काळ विरंगुळा मिळाला. तसेच महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा, एकोपा, संघभावना आणि परस्पर स्नेह वृद्धिंगत करण्यास या कार्यक्रमाची मदत झाली.सत्यनारायण महापूजा, मंगळागौरी, ढोल-ताशा व विविध मनोरंजनात्मक खेळ यामुळे संपूर्ण कार्यक्रमाला धार्मिक, सांस्कृतिक आणि आनंदमय वातावरणाची जोड मिळाली. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment