Skip to main content
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचा वर्धापन दिन उत्साहात सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचा (७ सप्टेंबर१९४१) वर्धापन दिन वाघीरे महाविद्यालय, सासवड येथे उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. संजय झगडे, वाणिज्य विभाग समन्वयक डॉ. एम. एस. गिरी तसेच कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य सतीश जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे प्रेरणास्थान असलेल्या स्वर्गीय बाबुरावजी घोलप साहेब, कै मामासाहेब मोहोळ, कै. शंकरराव उरसळ, कै. रामकृष्ण मोरे, कै. अजितदादा पवार तसेच क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या स्थापनेपासूनच्या वाटचालीचा आढावा घेण्यात आला.अध्यक्षीय मनोगतात डॉ. नितीन घोरपडे यांनी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानावर प्रकाश टाकला. संस्थेच्या जडणघडणीत संस्थाध्यक्षांचे योगदान, दूरदृष्टी आणि शैक्षणिक विकासासाठी केलेले कार्य याविषयी त्यांनी माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था सातत्याने कार्यरत असून, गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच संस्कार आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून होत असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, सहकारी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थितांनी संस्थेच्या पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. किरण गाढवे यांनी केले .
Popular posts from this blog
Comments
Post a Comment