Skip to main content
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम स्कूल येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम स्कूल, सासवड येथे शिक्षक दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा वेश परिधान केलेल्या कृष्णा क्षीरसागर व विद्यार्थ्यांमधून मुख्याध्यापिका झालेल्या अक्षरा क्षीरसागर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी नृत्याच्या माध्यमातून सुंदर स्वागतगीत सादर करून उपस्थितांचे मन जिंकले.यावेळी शिक्षकांमधून माधुरी साठे यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व विशद केले. भाऊसाहेब येळे यांनी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा गौरवशाली इतिहास तसेच संस्थेच्या संस्थापकांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.मुख्याध्यापिका सरोज जांगडा यांनी सर्व शिक्षकांना भेटकार्ड देऊन त्यांच्या कार्याचे कौतुक केले. आपल्या मनोगतात त्यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनातील शिक्षकांचे महत्त्व अधोरेखित करत शिक्षकांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती भोसले व सुप्रिया कटके यांनी केले, तर स्वाती पांढरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. शिक्षक दिनाच्या निमित्ताने शाळेतील वातावरण आनंदमय व उत्साहपूर्ण झाले.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment