Skip to main content
पुरंदर तालुक्यातील आस्करवाडी येथे पुन्हा एकदा हुक्का पार्लरवर सासवड पोलिसांची धाड हुक्का पोट फ्लेवरचं 98 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त तर दोघावर गुन्हा दाखल सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: आस्करवाडी तालुका पुरंदर येथील गावच्या हददीमधील हॉटेल कसूल कॅफे या हॉटेलमध्ये 1 सप्टेंबर रोजी रात्री 00: 30 वाजता मिळालेला मुद्देमाल 1) 75, 200 किमतीचे वेगवेगळ्या रंगाचे काचेचे बनविलेले हुक्का प्रत्येकी किंमत 4700, 2) 18,500रु किमतीचे वेगवेगळे कंपनीचे तंबाखूजन्य पदार्थांचे फ्लेवरने भरलेली चौकोनी व गोलाकार दहा टप्पे प्रत्येकी किंमत 850 रुपये, 3) पाच हजार रुपये किमतीचे हुक्का ओढण्याची 10 सवरी पाईप प्रत्येकी किंमत 500रु एकूण 98 हजार 700 रुपये किमतीचा तंबाखूजन्य हुक्का फ्लेवर हुक्का पोट व इतर साहित्य आढळून आल्याने 1) सौरभ सुखदेव पोमण वय 28 वर्षे राहणार कसूल कॅफे हॉटेल मूळ राहणार पिंपळे तालुका पुरंदर जिल्हा पुणे, 2) अभिजीत गणेश कामठे वय 25 वर्ष राहणार चांभळी तालुका पुरंदर जिल्हा पुणे हे ग्राहकांना धूम्रपानासाठी अवैध रित्या आहे त्या ठिकाणी हुक्का बार चालविताना आढळून आले आहेत, त्या ठिकाणी मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पल्लवी भुजंग काळे महिला पोलीस चालक शिपाई सासवड पोलीस स्टेशन त्यांनी त्यांच्याविरुद्ध सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने महाराष्ट्र सुधारणा अधिनियम 2018 चे कलम चार अ, 21 अन्वय कायदेशीर रित्या पोलीस स्टेशनला माहिती दिली आहे सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या अधिपत्याखाली पोलीस हवालदार विनायक हाके हे पुढील तपास करीत आहेत.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment