Skip to main content
पुरंदर तालुक्यातील सासवड येथील इंदिरानगर या परिसरामधील लक्ष्मीआई मंदिराच्या बाजूच्या पत्र्याच्या शेडच्या आडोशास जुगाराचा कॅट 4 हजार050 रुपये किमतीचा मुद्देमाल सासवड पोलीस स्टेशन कडून जप्त सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सहा सप्टेंबर रोजी 14:00 वाजता च्या सुमारास मोजे इंदिरानगर सासवड तालुका पुरंदर येथील गावच्या हद्दीमधील लक्ष्मीआई मंदिराच्या बाजूस असलेल्या पत्र्याच्या शेडच्या आडोशामध्ये 1) पन्नास रुपये किमतीचे 52 पानाचा जुगारासाठी वापरण्यात येणारी इंग्लिश कंपनीचे एक कॅट, 2) चार हजार रुपये रोख रक्कम त्यामधील 500 रुपये दराच्या एकूण सात नोटा, शंभर रुपये दराच्या एकूण पाच नोटा असा एकूण 4050 रुपये येणे प्रमाणे 1) किरण रमेश जाक्स वय 37 वर्ष व्यवसाय मजुरी राहणारी इंदिरानगर सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे, 2) लौकिक गणेश राऊत वय 22 वर्ष व्यवसाय मजुरी राहणार इंद्रानगर सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे, 3) सुरज विश्वास जाधव वय 38 वर्ष व्यवसाय मजुरी राहणार इंदिरानगर सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे, 4) रवींद्र काशिनाथ पाटील वय 58 वर्षे व्यवसाय मजुरी राहणारी इंदिरानगर सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे हे जुगार खेळत असताना मिळून आले असताना, चार हजार रुपये रोख रक्कम व 50 रुपये किमतीचे एक जुगाराची कॅट असा एकूण चार हजार पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला असून, त्यांच्याविरुद्ध फिर्याद तुषार बाळू लोंढे सासवड पोलीस स्टेशन यांनी त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिक कलम 12 (अ )प्रमाने सरकार तर्फे कायदेशीर फिर्याद दाखल केली आहे. सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या अधिपत्याखाली पोलीस हवालदार अमोल लडकत हे पुढील तपास करीत आहेत.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment