Skip to main content
पुरंदर तालुक्यामध्ये अक्षरशा: विजेचा लपंडाव सध्या सुरूच तर जाहीर वेळापत्रक न पाळल्याने संतप्त असे शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यांमध्ये सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : विजेच्या लपंडावामुळे पुरंदर तालुक्यातील पूर्व भागांमधील गावांमधील शेतकरी पूर्णपणे त्रस्त झालेले असून, महावितरणाने मागील तीन दिवसांमध्ये तीन तासही शेतीसाठी वीज पुरवठा सुरळीत केला नसल्या कारणामुळे, शेतकरी अक्षरशा: संतप्त झालेले आहेत, जाहीर वेळेला पत्रकानुसार वीज पुरवठा केला नाही तर शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यामध्ये आहेत, महावितरणची माळशिरस परिसरातील या आठवड्यातील रात्रीच्या शेतीसाठी वीज पुरवठा देण्याची नियोजन हिवाळा पत्रक होते, हे वेळापत्रक निश्चित करताना त्यांनी आठ तास ऐवजी सहा तासाची आठवडाभरासाठीचे वेळापत्रक जाहीर केले होते, मात्र हे वेळापत्रक सुरू होताच, काही तीन दिवसांमध्ये एकही दिवस सहा तासाचे ठरल्याप्रमाणे वेळापत्रक महावितरण ला पाळता आलेले नाही, पावसाने पाठ फिरवल्या या कारणामुळे शेतकरी खरीपातील पिके कशी बशी जगण्याकरता अंधारात देखील विहिरी वर जाऊन विजेची वाट पाहत असे, असे असताना देखील तीन दिवसांमध्ये पहिल्या दिवशी सुद्धा वीज पुरवठा नऊ वाजता फक्त एक तास सुरू होता, त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी एक तास 35 मिनिटे व तिसऱ्या दिवशी केवळ फक्त 45 मिनिटांमध्ये वीज पुरवठा बंद करण्यात आला असून, तीन दिवसांमध्ये शेतकऱ्यांना शेताच्या वाफ्यापर्यंत पाणी जाईपर्यंत वीजपुरवठा बंद अशी परिस्थिती सर्वत्र पाहायला मिळत होती, यामुळे शेतकरी अत्यंत संतप्त झाले असून, महावितरण कंपनीने याबाबत त्वरित सुधारणा करणे गरजेचे असल्याचे शेतकरी बोलू लागलेले आहेत, अन्यथा या विरोधामध्ये मोठ्या आंदोलनाला सामोरे जावे लागेल अशी शेतकरी गणेश काशिनाथ मोरे यांनी सांगितले. नवे वेळापत्रकही कोलमडले शेतीसाठी महावितरणने, दिवसभरामध्ये दोन फिडरला सकाळी सहा ते बारा दुपारी बारा ते संध्याकाळी सहा अशा प्रकारचे वेळापत्रक रात्री उशिरा जाहीर केले होते, यामुळे आता दिवस तरी त्या ठरलेल्या सहा तासात वेळेत वीज पुरवठा होईल की नाही, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना निर्माण झालेली आहे ,मात्र गुरुवारी दिनांक 10 दुपारी बारापासून भुलेश्वर फिडर परिसरामध्ये वीजपुरवठा सुरू झाला नाही, यामुळे शेतकरी अधिक संतप्त झाले आहेत, पिसर्वे, मावडी सुपे, पिंपरी, नायगाव, राजुरी, रिसेपिसे सह माळशिरस, पोढे आदी भागातील शेतकऱ्यांनी या ठिकाणी सहभाग घेतला होता, शेतकऱ्यांनी महावितरणला ओव्हरलोड रोहित सर्किट बदलणे, लोंबलेल्या तारा काढणे, कटआउट नसणे याच बरोबर सिंगल फेजिंग गावठाणा बरोबर वाडी वस्तीवरही करणे, या संदर्भात भरपूर प्रमाणामध्ये मागण्या मांडल्या आहेत, पिसर्वे स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये विजेच्या प्रचंड मागणी यामुळे ओव्हरलोड होत आहे, लवकरच ही समस्या अडचण दूर करून सुरळीत वीज पुरवठा केला जाईल असे उपअभियंता सासवड विभाग धीरज कुमार गायकवाड यांनी सांगितले आहे, तरी या संदर्भात नायगाव मधून पत्रकार चंद्रकांत चौंडकर, राजुरी मधून अंकुश बाप्पू भगत, पिसे येथून संतोष हरिभाऊ मुळीक या शेतकऱ्यांनी पूर्व भागातील असणाऱ्या समस्या शेतीच्या बाबतीत महावितरणचे सहाय्यक अभियंता राजेवाडीचे जीवन ठोबरे विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यासमोर समस्या मांडल्या.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment