Skip to main content
पुरंदर तालुक्यातील तहसील कार्यालयांमधील क्लार्क 25 हजाराची लाच घेताना रंगेहात पकडला ; तर जमिनीच्या प्रकरणाचा आदेश लवकर मिळवून देण्यासाठी लाच मागितल्याचा आरोप एसीबीची कारवाई सासवडमध्ये सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: वडिलोपार्जित जमिनीच्या प्रकरणाचा आदेश तहसीलदाराकडून लवकर मिळवून देण्यासाठी 25,000 रुपयाची लाज स्वीकारताना तहसील कार्यालयातील क्लार्क लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एसीबी पुणे युनिट ने बुधवारी दिनांक दोन रोजी सासवड येथे रंगेहात पकडले, विजय मल्हारी खळदकर वय 57 राहणार कुंभारवळण तालुका पुरंदर अशी ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून, याबाबत 47 वर्षीय तक्रारदाराने एसीबी कडे तक्रार दिली होती, तक्रारदाराच्या वडिलोपार्जित जमिनीचा पुरंदर तहसीलदार यांच्या न्यायालयात असमान हिस्स्याबाबतचा वाद सुरू होता, संबंधित गट क्रमांक 769 मधील जमिनीच्या प्रकरणात 24 जून 2026 रोजी तहसीलदारांनी दोन्ही बाजूंना समान संधी देऊन सुनावणी पूर्ण केली होती, मात्र त्या नंतर आदेश जारी करण्यात आलेला नव्हता या आदेशाबाबत चौकशी करण्यासाठी तक्रारदार 29 ऑगस्ट रोजी पुरंदर तहसील कार्यालयात गेले होते, त्यावेळी त्यांची भेट क्लार्क विजय खळदकर यांच्याशी झाली होती खळदकर यांनी प्रकरण तहसीलदार समोर ठेवण्यासाठी सुरुवातीला पाच हजार रुपयाची लाज मागितल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता, तक्रारीची पडताळणी एसीबी कडून बुधवारी करण्यात आली या पडताळणी दरम्यान तक्रारदाराच्या वडिलोपार्जित जमिनीच्या सुनावणीचा आदेश तहसीलदारकडून देण्यासाठी खळद कर यांनी 25 हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले, त्यानंतर एसीपी च्या पुणे युनिटनेस सापला रचून तहसीलदार कार्यालय मधील रोहित हॉटेल जवळ सासवड येथे पंचा समक्ष पंचवीस हजार रुपयाची लाची रक्कम स्वीकारताना खळदकर यांना रंगे हात पकडण्यात आले सापळा कारवाईनंतर खळदकर हे खाजगी व्यक्ती असल्याचे निष्पन्न झाले असून, त्यांना दुपारी दोन वाजून एक मिनिटांनी ताब्यात घेण्यात आले, याप्रकरणी सासवड पोलीस ठाणे पुणे ग्रामीण येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 मधील कलम सात अन्वये गुन्हा शाखा शिरीष सरदेशपांडे आणि अप्पर पोलीस अधीक्षक एक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली लाच मागितल्यास एसीबी शी संपर्क साधण्याचे आव्हान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणताही लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने काम करणारी व्यक्ती शासकीय कामासाठी लाच मागत असल्यास नागरिकांनी तातडीने प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा भ्रष्टाचार बंदी माहिती अथवा तक्रार असल्यास एसीबी कडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment