Skip to main content
श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर आणि महसूल दिन सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रथम जयंतीनिमित्त आयोजित “श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर” व “महसूल दिन” हा कार्यक्रम वीर येथील सवाई मंगल कार्यालय सभागृहात उत्साहात पार पडले.या शिबीराच्या माध्यमातून महसूल दिन, कृषी व इतर सर्व विभागांच्या विविध योजनांचा लाभार्थ्यांना प्रत्यक्ष जागेवरच लाभ वितरण करण्यात आले. या शिबिरातील प्रमुख लाभ वितरण आणि सेवा:• कृषी साहाय्य: ट्रॅक्टर आणि शेती अवजारांचे वाटप, पी.एम. किसान योजना आणि शेतकरी e-KYC अद्ययावतीकरण.• महसूल सेवा: प्रलंबित फेरफार आणि तडजोडीच्या केसेसचे जागेवरच त्वरित निराकरण.• नोंदणी व दुरुस्ती: सातबारा मधील चुकीची दुरुस्ती, भूमापन कमी-जास्त पत्रक, आणि डिजिटल ७/१२ व ८-अ उतारे वितरण.• दाखले वितरण: उत्पन्न दाखले, रहिवासी (डोमासाईल), जातीचे दाखले आणि नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्रांचे वाटप.• सामाजिक आणि इतर योजना: संजय गांधी सामाजिक सहाय्य योजना, कृषी विभागाचे विविध लाभ, e-मोजणी आणि ॲग्री स्टॅक प्रक्रिया.या महत्त्वपूर्ण कार्यक्रमास शेखरजी वढणे (भाजपचे पुणे-दक्षिण जिल्हाध्यक्ष), गंगारामदादा जगदाळे (जिल्हा सरचिटणीस), आनंद संजय जगताप (सासवड शहर अध्यक्ष), हरिभाऊ लोळे (जिल्हा परिषद सदस्य), हनुमंत साळुंखे यांच्यासह विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने या शिबिरास उपस्थित होते.शासनाच्या योजना थेट जनतेच्या दारी पोहोचवून सर्वसामान्यांना तत्पर आणि पारदर्शक सेवा देण्यासाठी भाजपा-महायुती सदैव कटिबद्ध राहील!
Popular posts from this blog
Comments
Post a Comment