Skip to main content
पुरंदर तालुक्यामध्ये सासवड पोलीस ठाण्याच्या वतीने मुख्य रस्ते व मंदिर परिसरामध्ये बॅरिकेडिगसह बेकायदा पार्किंग करणाऱ्या वाहनावर थेट जॅमर लावण्याची थेट कारवाई सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : श्री क्षेत्र नारायणपूर येथील प्रसिद्ध असणाऱ्या दत्त मंदिरामध्ये दर गुरुवारी दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी वाढत असते, त्यामुळे होत असलेल्या वाहतूक कोंडीवर सासवड पोलिसांनी कठोर अशी पावले उचललेली आहेत वाहतूक सुरळीत करण्यासाठी सासवड पोलीस ठाण्याच्या वतीने मुख्य रस्ते व मंदिर परिसरामध्ये बॅरिकेडिगसह बेक कायदा पार्किंग करणाऱ्या वाहनावर थेट जॅमर लावण्याची कारवाई सुरू केलेली आहे. सासवडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी मंदिर परिसरामध्ये प्रमुख रस्ते आणि वाहतुकीच्या संवेदनशील ठिकाणी पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तैण्यात करण्यात आलेला होता ,त्यामुळे कायदा पालन न पार्किंग करणाऱ्या जॅमर लावला जाणार आहे .दर गुरुवारी मंदिर परिसरामध्ये वाहनाची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्यामुळे आळा बसणार आहे यामुळे भावीकांना दिलासा मिळणार असल्याकारणामुळे स्थानिक नागरिकांनी या कारवाईचे स्वागत एक प्रकारे केलेले आहे. मोहीम सातत्याने राबवावी अशी अपेक्षा सर्वसामान्य व ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. सासवड पोलीस स्टेशनला वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे आल्यापासून बऱ्याच प्रमाणामध्ये त्या ठिकाणी बदल होत असताना दिसत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक व ग्रामस्थ ही एक प्रभावीपणे सासवड पोलीस स्टेशन चा कारभार चांगल्या पद्धतीने पारदर्शक पद्धतीने चालू आहे, अशी प्रतिक्रिया शकील बागवान पेपर स्टॉल सासवड नगरपालिका शेजारी यांनी ही सर्व माहिती प्रतिनिधीला दिली.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment