Skip to main content
पुरंदर तालुक्यातील सासवड पोलिसांची काळ्या काचांविरोधात धडक कारवाई; २२ वाहनांवर कारवाई, ३७,५०० रुपयांचा दंड वसूल सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई केली. नाकाबंदी दरम्यान विशेषतः थार कंपनीच्या वाहनांवरील नियमबाह्य काळ्या काचा तपासून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली.या कारवाईदरम्यान एकूण २२ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून, संबंधित वाहनचालकांकडून ३७,५०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.वाहनांच्या काचांवर नियमबाह्य पद्धतीने काळी फिल्म अथवा काळ्या काचा लावल्यामुळे वाहनाच्या आतील भागाचे दृश्य अस्पष्ट होते. त्यामुळे वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अशा वाहनांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली.सासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर यापुढेही अशाच प्रकारे कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.एकूण कारवाई : २२ केसेसवसूल केलेला दंड : ₹३७,५००/-अशी माहितीनुसार सासवड पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी दिली.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment