Skip to main content
एस.एन.डीटी महिला विद्यापीठाच्या विद्यार्थिनींची उत्स्फूर्त तिरंगा रॅली सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आयोजित स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर एस.एन.डीटी महिला विद्यापीठाच्या पुणे येथील एस.एन.डीटी कॉलेज ऑफ होम सायन्स विद्यार्थिनींनी मंगळवारी (दि. ११ ऑगस्ट)तिरंगा रॅली मध्ये सहभाग नोंदवला. प्राचार्य डॉक्टर गणेश चव्हाण सर यांनी मार्गदर्शन केले. एन.एस.एस अधिकारी डॉक्टर ललिता भगत यांनी नेतृत्व केले. महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हातात तिरंगा ध्वज घेऊन सहभागी विद्यार्थिनींनी देशभक्तीपर घोषणा देत परिसर दुमदुमून सोडला. रॅलीतून राष्ट्रप्रेम, एकता आणि राष्ट्रीय अभिमानाचा संदेश देण्यात आला. विविध वयोगटातील विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग हे रॅलीचे प्रमुख आकर्षण ठरले. तिरंग्याच्या रंगांनी संपूर्ण परिसर भारावून गेला होता. ‘हर घर तिरंगा’ आणि राष्ट्रभक्तीची भावना जनमानसात रुजविण्याचा संदेश या रॅलीतून देण्यात आला.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment