Skip to main content
चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत बाल विकास मंदिरचा श्रेयस वाघोले चमकलाजिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत स्थान; शहरी भागात पुरंदर तालुक्यात प्रथम क्रमांक सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बाल विकास मंदिर, सासवड या शाळेतील इयत्ता चौथीतील विद्यार्थी श्रेयस सचिन वाघोले याने एप्रिल २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. श्रेयसने आपल्या गुणवत्तेच्या जोरावर पुणे जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळविले असून, शहरी भागातून पुरंदर तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविण्याचा मान संपादन केला आहे.श्रेयसने मिळविलेल्या या यशामुळे बाल विकास मंदिर, सासवडच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. नियमित अभ्यास, सातत्य, जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शन यांच्या जोरावर त्याने हे यश मिळविले.शिष्यवृत्ती परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेबरोबरच त्यांची आकलनशक्ती, तर्कशक्ती, गणितीय कौशल्य, भाषिक क्षमता आणि सामान्य ज्ञान यांची कसोटी पाहणारी महत्त्वाची परीक्षा आहे. या परीक्षेच्या तयारीसाठी श्रेयसने शाळेतील अध्यापनाबरोबरच नियमित सराव व मार्गदर्शन घेतले. श्रेयसच्या या यशामध्ये शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब बडधे तसेच वर्गशिक्षक नरेंद्र महाजन यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या गुणवत्तेचा योग्य प्रकारे विकास व्हावा, यासाठी सातत्याने सराव, मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिले.श्रेयसच्या यशाबद्दल शाला समितीचे अध्यक्ष राहुल मिरासदार, महामात्र सुधीर भोसले, मुख्याध्यापक भाऊसाहेब बडधे , श्रेयसचे आई बाबा , शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग आणि विद्यार्थ्यांनी त्याचे अभिनंदन केले. त्याच्या या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक वाटचालीला प्रेरणा मिळाली असून, इतर विद्यार्थ्यांसाठीही श्रेयसचे यश आदर्श ठरले आहे.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment