Skip to main content
राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) पुणे जिल्हा ग्रामीणच्या पुरंदर तालुका अध्यक्षपदी राहुल पवार यांची नियुक्ती सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक), पुणे जिल्हा (ग्रामीण) यांच्या वतीने राहुल पवार यांची पुरंदर तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचे पत्र पुणे जिल्हा (ग्रामीण) अध्यक्ष विजय सुदामराव जाधव यांनी २ ऑगस्ट २०२६ रोजी प्रदान केले.राहुल पवार यांनी विविध क्षेत्रांतील कामगारांच्या हितासाठी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. प्रदेशाध्यक्ष कैलास भाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली आणि संघटनेच्या ध्येय-धोरणानुसार कामगारांना न्याय मिळवून देणे, त्यांच्या हक्कांसाठी कार्य करणे तसेच संघटना अधिक बळकट करण्यासाठी योगदान देण्याची अपेक्षा नियुक्तीपत्रात व्यक्त करण्यात आली आहे.या नियुक्तीबद्दल राहुल पवार यांच्यावर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, पुरंदर तालुक्यातील कामगारांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी ते प्रभावीपणे कार्य करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment