Skip to main content
विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न... सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: जनसेवा संकल्प फाऊंडेशन, पुणे यांच्या वतीने एम.ई.एस. इंग्लिश मिडियम स्कूल, सासवड येथे विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने विविध आरोग्य तपासण्या करण्यात आल्या.शिबिरात दंत तपासणी, डोळ्यांची तपासणी, बालरोग तपासणी तसेच आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांना आरोग्याविषयी योग्य माहिती मिळाली तसेच नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.या शिबिरासाठी दंतरोग तज्ज्ञ डॉ. प्रसन्न होळकर व डॉ.सरिता कदम ,नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. हरीकिशन दरडे आणि बालरोग तज्ज्ञ डॉ. प्रतीक मेमाणे यांनी विद्यार्थ्यांची तपासणी करून आवश्यक मार्गदर्शन केले.या उपक्रमाचे आयोजन जनसेवा संकल्प फाऊंडेशनच्या अध्यक्षा व संस्थापिका सरोज जांगडा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment