Skip to main content
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड शहरातील शिवतीर्थ चौक येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त समाजबांधव, सहकारी आणि नागरिकांसमवेत त्यांना विनम्र असे अभिवादन केले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य, शाहिरी आणि प्रखर सामाजिक विचारांतून वंचित, शोषित आणि कष्टकरी समाजाला हक्काचा आवाज मिळवून दिला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी आपल्या ओजस्वी शाहिरीतून मोठी जनजागृती करत महाराष्ट्राच्या अस्मितेला बळ दिले. त्यांचे समता, स्वाभिमान आणि सामाजिक न्यायाचे विचार आजही संपूर्ण समाजाला प्रेरणा देणारे आहेत. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे आणि समाजातील प्रत्येक घटकाच्या सन्मानासाठी तसेच सर्वसमावेशक विकासासाठी कार्य करणे, हीच त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल. याप्रसंगी भाजपा पुणे जिल्हाध्यक्ष शेखरजी वढणे, पुणे जिल्हा सरचिटणीस गंगाराम(दादा) जगदाळे, सासवड शहर अध्यक्ष आनंद संजय जगताप, जिल्हा उपाध्यक्ष साकेत जगताप, हनुमंत साळुंखे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment