Skip to main content
पुरंदर तालुक्यात जागतिक आदिवासी दिन रविवार 9 ऑगस्ट आदिवासी पाडा बहिरवाडी व आदिवासी पाडा चिवहेवाडी येथे संपन्न होणार सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: आदिवासी पाडा बहिरवाडी व आदिवासी पाडा चिवहेवाडीे येथे आदिवासी दिन रविवारी 9 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत आदिवासी कल्याण व संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य आणि आदिवासी कल्चर अँड सोशल ऑर्गनायझेशन महाराष्ट्र राज्य संस्थेची स्थापना आदिवासींच्या कल्याणासाठी व आदिम संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी झाली असून, आदिवासी जमात बांधवांची हिवाळ्याचे प्रश्न सनदशीर व न्याय मार्गाने सोडवण्यासाठी आणि संस्थेचे ध्येय व उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्वच कार्यकर्ते वाड्या व वस्त्यावर सातत्याने विविध कार्यक्रम घेऊन समाज प्रबोधन लोक जागृती व लोकशिक्षणाचे कार्य करीत आहेत. त्याच अनुषंगाने 9 ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते दोन या वेळेमध्ये सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील आदिवासी महादेव कोळी यांची संघर्ष भूमी आणि आदिवासी क्रांतिकारक कृष्णाजी साबळे यांची जन्मभूमी कातुरजाई देवी मंदिर आदिवासी पाडा चिवहेवाडी व आदिवासी पाडा बहिरवाडी येथे विश्व आदिवासी दिन निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम समाज प्रबोधन, व्याख्याने, आदिवासी आद्य क्रांतिकारक अभिवादन रॅली, वनभोजन ,आदिवासी संस्कृती, रूढी परंपरा, आदिवासी नृत्य ,सॉंग भारुड आदिवासी कला प्रकार सादर करण्यात येणार आहेत, तसेच लोक जागृती व शैक्षणिक कार्यक्रमाचे आदिवासी कल्याण संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य आणि आदिवासी कल्चर अँड सोशल ऑर्गनायझेशन महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने करण्याचे योजिलेले आहे तरी या संदर्भात वर्षा लांडगे उपविभागीय अधिकारी पुरंदर, विक्रम राजपूत तहसीलदार पुरंदर, प्रणोती श्रीश्रीमाळ गटविकास अधिकारी पुरंदर यांना निवेदन आदिवासी पाडा बहिरवाडी व आदिवासी पाडा चिवहेवाडी यांनी निवेदन सादर केलेले आहे .या संदर्भात प्रामुख्याने आदिवासी पाडा बहिरवाडी व आदिवासी पाडा चिवहेवाडी येथील प्रमुख समन्वयक व आयोजक यांनी यासंदर्भातील माहिती प्रतिनिधीला दिली.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment