Skip to main content
पुरंदर तालुक्यातील देवडी येथील गोदरेज कंपनीचे लोखंडी कपाटाचे लॉक तोडून कपाटातील रोग कॅश पेमेंट अज्ञात चोरट्याकडून चोरी सासवड प्रतिनिधी: मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: देवडी ता. पुरंदर येथील सहा ऑगस्ट रोजी दुपारी 2:30 वाजता ते सायंकाळी 6:00 च्या सुमारामध्ये देवडी गावच्या हद्दीतील दरवाजाला कुलूप लावले असता व त्या ठिकाणी शेतामध्ये म्हैस घेऊन शेतकरी गेले असता, त्यांच्या घराच्या दरवाजाला लावलेले कुलूप कोणीतरी अज्ञात चोरट्याने तोडून दरवाजा द्वारे घरात प्रवेश करून, घरातील गोदरेज कंपनीचे लोखंडी कपाटाचे lok तोडून कपाटातील ड्रॉवर उघडून त्यामधील असणाऱ्या वरील वर्णनाच्या चलनी नोटांमध्ये पन्नास हजार रुपये च्या 500 रुपयांच्या 100 भारतीय चलनी नोटा त्या ठिकाणी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या असून, म्हणून त्या संदर्भात फिर्यादी आत्माराम गेनबा भोसले वय 65 व्यावसाय शेती राहणार देवडी तालुका पुरंदर यांनी सासवड पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या अधिपत्याखाली पोलीस हवालदार जाधव हे पुढील तपास करीत आहेत.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment