पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी क्रिप्टो गुंतवणुकीच्या आमिषाने 21 लाख 75 हजार रुपयाची फसवणूक ; तर पाच जणांविरुद्ध सासवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड ता. पुरंदर येथील एसटी स्टँड जवळ चार ऑगस्ट रोजी 19 : 31 वाजता आरोपी शुभम प्रकाश जगताप, संतोष पोपट कटके, संकेत इनामके यांनीtrillioner कंपनीच्या tlc 2.0 फ्री लॉज क्रिप्टो कॉइन मध्ये गुंतवणूक केल्यास चाळीस टक्के बोनस, कॉइन दरमहा चार पाच टक्के परतावा तसेच दाम दुप्पट ते पाच पट नफा मिळेल.असे खोटे आश्वासन देऊन फिरेयादी व त्यांच्या कुटुंबीयांचा विश्वास संपादन केला असता, आरोपींनी फिर्यादी कडून विविध तारखांना अनिता प्रकाश जगताप व कालिका न्यानेश्वर शिंदे यांच्या बँक खात्यावर आरटीजीएस ऑनलाईन द्वारे रक्कम जमा करून घेतली असून, फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांकडून एकूण 21, 75, 900 इतकी रक्कम गुंतवणुकीच्या नावाखाली स्वीकारली आहे. सुरुवातीला काही परतावा देऊन विश्वास निर्माण करण्यात आला आहे. मात्र नंतर मूळ रक्कम व उर्वरित परतावा देण्यास टाळाटाळ करून कंपनीचे मार्केट डाऊन असल्याची कारणे सांगितली आहेत तसेच आरोपींनी इतर गुंतवणूकदारांनाही अशाच प्रकारे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करून आर्थिक फसवणूक केली आहे. त्यामुळे आरोपी शुभम जगताप ,संतोष कटके, संकेत इनाम के, अनिता प्रकाश जगताप व कालिका ज्ञानेश्वर शिंदे यांनी संगणमताने फिर्यादी व इतर गुंतवणूकदाराची एकूण 21,75, 900 ची आर्थिक फसवणूक व अपहर केल्याबाबत कायदेशीर कारवाईची फिर्याद दिलेली आहे. फिर्याद हर्षदा अमोल मुरहे वय 36 वर्ष व्यावसाय ब्युटी पार्लर राहणार सुभालक्ष्मी निवास के एन पी कॉलेज जवळ पंढरपूर फाटा शिरवळ तालुका खंडाळा जिल्हा सातारा यांनी सासवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे. सासवड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 361/2026 भा.न्या.सं.का.क 318 (4),316, 61 (2 )महाराष्ट्र ठेविदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम 1999 चे क 3,4 बेकायदेशीर ठेव योजना प्रतिबंध अधिनियम 2019 चे का.क 21, 22 ,23 पुरस्कार चिट्टी व पैशाचा खप अधि 1978 चे चेक 4,5 यानुसार सासवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे. सासवड पोलीस स्टेशन येथे दाखल केला आहे पोलीस हवालदार चव्हाण यांनी यासंदर्भात गुन्हा दाखल करून घेतला आहे तर पुढील तपासासाठी सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी यासंदर्भातील स्वतः त्या ठिकाणी पुढील तपास करीत आहेत.

Comments