Skip to main content
पुरंदर तालुक्यातील आदिवासी पाडा चिव्हेवाडी येथे आदिवासी कल्याण व संवर्धन, महाराष्ट्र राज्य आणि आदिवासी कल्चर ॲन्ड सोशल ऑर्गनायझेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आदिवासी दिन कार्यक्रम उत्साहात सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : कार्यक्रमाची सुरुवात देवराई दिंडी पासून झाली असून चिव्हेवाडी वाडग्यापासून ते आदिवासी आदिमाता कातुरजाई देवळापर्यंत देवराई दिंडी काढण्यात आली, आदिवासी पारंपरिक खेळ आणि वाद्यांने तसेच हर हर महादेव, जय आदिवासी आवाजाने परिसर दुमदुमून गेला.कातुरजाई देवळाच्या प्रांगणात आदिवासी फेऱ्यांचा खेळ खेळण्यात आला,आदिवासी माता कातुरजाई ,मळाईदेवीला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमात आदिवासी क्रांतीकारक भगवान बिरसा मुंडा,राघोजी भांगरे,कृष्णाजी साबळे,नाग्या कातकरी, तंट्यामामा भिल्ल,छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमामध्ये पुरंदरच्या आदिवासी पूर्वजांचा जनजागर करण्यात आला. किल्ले पुरंदरचा आदिवासी कोळी महादेव समाज हा मूलनिवासी असल्याचे 12व्या शतकापासून आणि त्याअगोदर पासूनचे असणारे पुरावे सापडतात.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून स्वराज्याच्या पायाभरणीत आणि स्वराज्य उभे करण्यात सिंहांचा वाटा हा कोळी महादेव समाजाचा त्यात पुरंदर अनेक कोळी महादेव समाजाकडे सरनाईक ,पाटीलकी आणि देशमुखी सुद्धा होती चिव्हे ,साबळे,कोंडके, मिसाळ,ढगारे,कारकूड,यादव,चोरघे, निरावडे,पवार,नाईलकर,रांजणे इत्यादी आडनावे त्यात आहेत.अनेक क्रांतीकारी लढ्यात पुरंदरच्या आदिवासींचे नाव अग्रगण्य आहे त्यात आदिवासी क्रांतीकारक कृष्णाजी साबळे आणि त्यांचा मुलगा मारुती साबळे हे अजरामर आहेत.येणाऱ्या काळात आदिवासी कोळी महादेव वीरांचे स्मारक शासकीय स्तरावर करण्याचे नियोजन आहे.आदिवासी संस्थेमार्फत आदिवासी कल्याण करणाऱ्या योजना,वनहक्क, शिक्षण,संस्कृती संवर्धन इत्यादीचे मार्गदर्शन करण्यात आले,तसेच रानभाज्यांचे प्रदर्शनही होते. कार्यकमास प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी कल्याण व संवर्धन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदिवासी अविनाशजी ठोंबरे आणि संस्थेचे सहकारी नारायण खंडागळे सासवड पोलिस स्टेशन ,आदिवासी पाडा चिव्हेवाडी गावचे सरपंच दिपक चिव्हे,निलेश यादव, मिसाळवाडी उपसरपंच ,उमेश मिसाळ,सदस्य बाळासो कोंडके, PSI शशिकांत निरावडे, सायली वाशिलकर, कल्यानीताई कोंडके आदिवासी महिलाही मोठ्या प्रमाणात होत्या तसेच कार्यक्रमाला आदिवासी पाडा चिव्हेवाडी, मिसाळवाडी,देवडी, कोंडकेवाडी,बहिरवाडी, वेताळमाळ, पानवडी,रांजणवाडा ,जेजुरी, निरा,भोर ,वेल्हा,जुन्नर इत्यादी सह्याद्रीतील डोंगर भागातील आदिवासी कोळी महादेव,डोंगर कोळी जमात बांधव उपस्थित होते.वनभोजन करून कार्यक्रमाची सांगता झाली.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment