Skip to main content
पुरंदर तालुक्यातील भिवडी येथील पवार वस्ती या ठिकाणी एका युवकास दमदाटी व मारहाण सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: भिवडी ता. पुरंदर येथील पवार वस्ती या ठिकाणी तीन ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारामध्ये 1) रवींद्र उर्फ अमित सुरेश गायकवाड, 2) शुभम पांडे ,3) सार्थक खोमणे, 4) रवींद्र यांच्या पत्नी नाव पूर्ण माहीत नाही सर्व राहणार भिवडी तालुका पुरंदर येथील एका युवकास शिवीगाळ दमदाटी करून, त्याच्या हातातील दाडक्यांनी हातावर पायावर मारहाण करून त्याला जखमी केले असता, रवींद्र यांच्या पत्नी ने नाकावर दगड मारून जखमी केले, तर त्या ठिकाणी रवींद्र यांनी त्या ठिकाणच्या महिलेचे गाऊन फाडून तिचे मनाला जास्त लजासपंद होईल असे घाण कृत्य केले, ही भांडणे सोडवण्यासाठी गेलेले असताना रवींद्र यांनी छातीत बुक्की मारली व लहान मुलांना देखील मारहाण केली सवॅ इसमांनी मिळून त्या ठिकाणी गाड्या फोडून घरातील फ्रिज असे एकूण 70 हजार रुपयांचे नुकसान केले आहे .घरात प्रवेश करून घरातील फ्रिजवर ठेवलेले वीस हजार रुपये रोख रक्कम रवींद्र यांनी घेतली असून व पिस्तुलाने तुमचे आखे घरदार मारून टाकीन अशा प्रकारची धमकी दिली आहे. म्हणून फिर्यादी अविनाश जनार्धन गायकवाड व 61 वर्ष व्यावसाय शेती राहणार पवार वस्ती भिवडी तालुका पुरंदर यांनी सासवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे. सासवड पोलीस स्टेशन मू.र. नंबर 363 /2026 भा. न्याय सह कलम 333, 74, 118(1),125(a), 115 (2), 352, 351 (2), 3 (5 ),324 (4 )नुसार गुन्हा दाखल झाला आहे .सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या अधिपत्याखाली पोलीस हवालदार जाधव हे पुढील तपास करीत आहेत.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment