Skip to main content
सासवडला पाणीपुरवठा करणारे गराडे धरण 'हाऊसफुल्ल'! निसर्गाचे आभार मानत पार पडले जलपूजन सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : सासवड शहर आणि परिसराची तहान भागवणारी जीवनदायिनी असलेले 'गराडे धरण' आज १०० टक्के भरले आहे. या आनंददायी घटनेचे औचित्य साधून आज धरणस्थळी विधिवत 'जलपूजन' करण्यात आले. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे सासवडकरांच्या वर्षभराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असून, परिसरातील बळीराजा आणि नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.जलदेवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करताना, अत्यंत भक्तीभावाने धरणाच्या पाण्याला साडी-चोळी, श्रीफळ आणि पुष्पहार अर्पण करण्यात आला. निसर्गाचे आभार मानत उपस्थितांनी एकमेकांना पेढे भरवून या सुवर्णक्षणाचा आनंद साजरा केला.गराडे धरण पूर्णपणे भरल्याच्या या मंगल प्रसंगी भाजपा जिल्हा सरचिटणीस व माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाराम(दादा) जगदाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे जलपूजन संपन्न झाले.यावेळी भाजपा सासवड शहर अध्यक्ष आनंद (भैय्या) संजय जगताप, सासवड शहर भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष जालिंदर(दादा) जगताप, सासवड शहर उपाध्यक्ष उदयराज जगताप, सासवड शहर सचिव ओंकार महागावकर, शिवाजी(बापू) जगदाळे, सुनील(तात्या) जगदाळे, समीर तरवडे, संदीपजी कदम, दत्तात्रय(आण्णा) जगदाळे, बाळासाहेब यादव, भानुदास(नाना) रावडे, सुभाष जगदाळे, प्रभाकर जगदाळे, संजय(नाना) रावडे, शांताराम रावडे, संदीप जगदाळे, लक्ष्मण जगदाळे, श्रेयश शेवाळे, अमोल जगदाळे, ओंकार जगदाळे, सोमनाथ जगदाळे, आणि सुजल जगदाळे आदींचा समावेश होता.पाण्याचा प्रश्न मिटल्याने संपूर्ण सासवड परिसरात समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment