Skip to main content
पुरंदर तालुक्यातील शिवरी येथील शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी शरद (चंद्र )पवार गटाला मोठा धक्का सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: शिवरीतील अनेक पदाधिकारी श्री यमाई माता देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी व विश्वस्त तसेच कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश पुरंदर तालुक्यातील राजकारणातील शिवरी गावातील शिवसेना शिंदे गटाचे अनेक प्रमुख पदाधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट आणि कार्यकर्ते व देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त व कार्यकर्त्यांची माजी आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करण्यात आला आहे .भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या मध्ये नवनियुक्त शिवरी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन विठ्ठल मारुती कामथे,सोसायटीचे माझी चेअरमन व विद्यमान संचालक धनंजय हरिभाऊ कामथे, माझी चेअरमन व विद्यमान संचालक समीर बुधाजी कामथे,तसेच संचालक तथा माझी चेअरमन ज्ञानेश्वर शंकर कामथे, संचालिका चित्रा विजय कामथे ,विजय रामदास कामथे,सेवानिवृत्त पोलीस अधिकारी यमाई माता देवस्थान कार्याध्यक्ष नवनाथ दत्तात्रय कामथे,देवस्थान खजिनदार नारायण महादेव कामथे, देवस्थान सचिव रवींद्र निवृत्ती कामथे,विश्वस्त महादेव मोगलराव कामथे,उपसरपंच अनंता शिवरकर, देवस्थान विश्वस्त युवराज नर्सिंग कामथे, विश्वस्त सुनील नानासो कामथे, माजी ग्रामपंचायत सदस्य,माजी खजिनदार यांचा कमिटी सुरेश लक्ष्मण लिंबोरे तसेच युवा उद्योजक निलेश कामथे,उमेश कामथे,सिद्धेश्वर कामथे,सागर गुरगुडे,सुरेश गायकवाड, तंटामुक्ती उपाध्यक्ष माजी संचालक भानुदास बाजीराव कामथे, राहुल दादा लिंबोरे, आबा खोमणे आणि असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे.यावेळी स्थानिक जिल्हा परिषद सदस्य अजय कैलास बापू इंगळे, जिल्हा परिषद सदस्य हरिभाऊ लोळे, पंचायत समिती सदस्य माऊली यादव ,सासवड नगरपालिकेचे बांधकाम सभापती नगरसेवक माऊली (काका )जगताप ,पुणे जिल्हा उपाध्यक्ष संभाजी नाना काळाने, तुषार बंटी जगताप ,कैलास बापू इंगळे ,पै पांडुरंग कामथे,माजी पंचायत समिती सदस्य बबनराव कामथे,खरेदी विक्री संघाची व्हॉइस चेअरमन संजय कामथे,माजी उपसरपंच विकास बापू कामथे,माजी उपसरपंच सचिन लहू कामथे,उद्योजक ज्ञानेश्वर लिंबोरे,उद्योजक विकास लिंबोरे ,उद्योजक सुजित लिंबोरे ,सुहेल कामथे,मधुकर कामथे,तंटामुक्ती अध्यक्ष सोमनाथ कामथे,चेतन कामथे, निलेश कामथे तसेच अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .यावेळी बोलताना माजी आमदार संजय जगताप यांनी प्रवेश करणाऱ्या सर्वांचे भारतीय जनता पक्षात स्वागत केले, शिवरी गावातील मान्यवरांनी विकासाच्या विचारावर विश्वास ठेवून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही, येणाऱ्या काळामध्ये सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांना सुरवोतोपर्यंत ताकद दिली जाईल व पुरंदर तालुक्यातील सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटीबद्ध असून, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्याचे काम पुढील काळामध्ये अधिक वेगाने केली जाईल.तशी जिल्हा परिषद सदस्य अजय कैलास बापू इंगळे यांनी आपल्या मनोगतमध्ये सांगितले की शिवरी गावातील मोठ्या प्रमाणावर झालेला हा प्रवेश म्हणजे विकासाच्या राजकारणावर नागरिकांनी व्यक्त केलेला विश्वास आहे ,सर्वांना सोबत घेऊन विकासाची नवी दिशा निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू ,शिवरी गावातील या मोठ्या राजकीय घडामोडीमुळे पुरंदर तालुक्यातील राजकीय समीकरणांना वेग आला असून, शिवसेना शिंदे गट साठी हा मोठा धक्का मानला जात आहे, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या प्रवेशाला विशेष असे महत्त्व प्राप्त झाले आहे .
Popular posts from this blog
Comments
Post a Comment