Skip to main content
खानवडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना अक्षरसृष्टी संस्थेकडून शैक्षणिक साहित्य वाटप सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खानवडी येथे अक्षरसृष्टी संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड वाढावी आणि त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला बळ मिळावे या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.यावेळी बहुजन हक्क परिषदेचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष डुबल, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष युवराज होले, मुख्याध्यापिका शुभांगी जगताप, अंगणवाडी सेविका ज्योती होले, अंगणवाडी मदतनीस शुभांगी होले तसेच तृप्ती बनकर उपस्थित होते.कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल व अन्य शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला.कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापिका शुभांगी जगताप यांनी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिल्याबद्दल अक्षरसृष्टी संस्थेचे मनःपूर्वक आभार मानले. अशा सामाजिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळते आणि समाजात शिक्षणाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण होते, असे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment