Skip to main content
स्व. एकनाथकाका जगताप प्रतिष्ठानचे शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान - शिवहार लहाने पुरंदर तालुक्यातील शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : म. ए. सो. वाघीरे माध्यमिक व उच्च विद्यालय, सासवड येथील विद्यार्थ्यांसह पुरंदर तालुक्यातील विविध शाळांमधील इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा नुकताच सासवड येथे संपन्न झाला. स्व. एकनाथकाका जगताप प्रतिष्ठान, सासवड चे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्तेसंतोष जगताप यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. भविष्यातील विविध स्पर्धा परीक्षांचा पाया या शालेय स्पर्धा परीक्षा असून विद्यार्थ्यांनी विविध शालेय स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होऊन यश संपादन केले पाहिजे असे मत त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना व्यक्त केले. तसेच प्रतिष्ठानचे सचिव, जेष्ठ पत्रकार हेमंत ताकवले यांनी वाघीरे विद्यालय, सासवड या शाळेच्या उज्वल परंपरेबद्दल कौतुक करून भविष्यातही विविध क्षेत्रात या विद्यालयाचे विद्यार्थी चमकतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच शाळा पदाधिकारी व मार्गदर्शक शिक्षक यांचे त्यांनी कौतुक केले. स्व.एकनाथकाका जगताप प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून पुरंदर तालुक्यातील विविध शाळांमधील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना मदत करून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले आहे. तसेच गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणातही अर्थसहाय्य देऊन समाजापुढे एक आदर्श निर्माण केला असून शिक्षण क्षेत्रातील या प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद आहे असे मत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे पुणे जिल्हा कार्यवाह शिवहार लहाने यांनी बोलताना व्यक्त केले. इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत सासवड येथील वाघीरे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केल्याबद्दल विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट देऊन त्यांचे कौतुक केले. म.ए. सो. वाघीरे विद्यालयातील पुणे जिल्हा गुणवत्ता यादीतील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी पुढीलप्रमाणे : इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यालयाचा वेदांत साबळे या विद्यार्थ्याचा ३०० पैकी २८४ गुण मिळवून गुणवत्ता यादीत राज्यात पाचवा क्रमांक आला आहे. तसेच यापूर्वी त्याची सैनिक स्कूल सातारा व नवोदय विद्यालय पुणे येथे प्रवेशासाठी निवड झाली आहे. इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यालयातील एकूण ५१ विद्यार्थी पात्र झाले असून अनन्या भिसे (मिळालेले गुण २४२), पूर्वा रासकर (२४०), सार्थ शिंदे (२३६), आरुष राऊत (२२६),अनुराज चाचर (२२४), शुभ्रा जगताप (२२४) व स्वराज पवार (२१८) हे सात विद्यार्थी पुणे जिल्हा गुणवत्ता यादीत आले असून एकूण आठ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत. इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यालयातील एकूण ८ विद्याथी पात्र झाले असून सिद्धी गजरे (२५८), अनघा जगताप (२२२) व सर्वेश लवांडे (२२२) हे तीन विद्यार्थी पुणे जिल्हा गुणवत्ता यादीतील असून शिष्यवृत्तीधारक झाले आहेत.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment