Skip to main content
सासवडच्या वाघीरे विद्यालयाचा विद्यार्थी वेदांत साबळे शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात पाचवा सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा राज्यात आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेचा दि. २ जुलै २०२६ रोजी जाहीर झाला असून इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत सासवड येथील वाघीरे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यालयाचा वेदांत साबळे या विद्यार्थ्याचा ३०० पैकी २८४ गुण मिळवून गुणवत्ता यादीत राज्यात पाचवा क्रमांक आला आहे. तसेच यापूर्वी त्याची सैनिक स्कूल सातारा व नवोदय विद्यालय पुणे येथे प्रवेशासाठी निवड झाली आहे. इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यालयातील एकूण ५१ विद्यार्थी पात्र झाले असून अनन्या भिसे (मिळालेले गुण २४२), पूर्वा रासकर (२४०), सार्थ शिंदे (२३६), आरुष राऊत (२२६),अनुराज चाचर (२२४), शुभ्रा जगताप (२२४) व स्वराज पवार (२१८) हे सात विद्यार्थी पुणे जिल्हा गुणवत्ता यादीत आले असून एकूण आठ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत. इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यालयातील एकूण ८ विद्याथी पात्र झाले असून सिद्धी गजरे (२५८), अनघा जगताप (२२२) व सर्वेश लवांडे (२२२) हे तीन विद्यार्थी पुणे जिल्हा गुणवत्ता यादीत असून शिष्यवृत्तीधारक झाले आहेत. विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या यशामागे विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण परिश्रम, शिक्षकांचे प्रभावी मार्गदर्शन, मुख्याध्यापकांचे नियोजन आणि पालकांचे सहकार्य महत्त्वाचे ठरल्याचे विद्यालयाचे शिक्षक शिवहार लहाने यांनी सांगितले. चाचण्यांचे नियमित आयोजन करण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि यशाचा आलेख उंचावत असल्याचेही त्यांनी सांगितले. शाळेत राबविण्यात येणारे विशेष मार्गदर्शन आणि शिक्षकांच्या अथक परिश्रमांमुळेच हे यश मिळाल्याचे विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र कांबळे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल शाला समिती अध्यक्ष राहुल मिरासदार, महामात्र सुधीर भोसले, मुख्याध्यापक राजेंद्र कांबळे, उपमुख्याध्यापक शंतनू सुरवसे, पर्यवेक्षिका अर्चना लडकत यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे. या विद्यार्थांना इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यालयातील शिक्षक शिवहार लहाने, अप्पासाहेब कोकरे, गणेश पाठक,प्रज्ञा पोटेगावकर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. तर इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी प्रशालेतील शिक्षक मंगल कोकरे, प्रमोद ठुबे, दिपाली लांडगे, गौरी ढगे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment