Skip to main content
पुरंदरमध्ये शिक्षकांचे शाळा बंद आंदोलनविविध मागण्यांसाठी शासनाविरोधात एल्गारधरणे आंदोलनाला शिक्षकांचा उस्फूर्त प्रतिसाद सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुणे जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने सासवड येथील प्रशासकीय इमारतीसमोर शाळा बंद व धरणे आंदोलन करण्यात आले. पुरंदर , भोर, राजगड हवेली तालुक्यातील विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी व शिक्षक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले. यावेळी शिक्षक नेते महादेव माळवदकर, नंदकुमार सागर, सुधाकर जगदाळे, वसंतराव ताकवले,रामदास अभंग, प्रा. सचिन दुर्गाडे, प्रा. शिवहर लहाने, शिवाजी राजिवडे,संजय धुमाळ, संदीप जगताप, सुनील लोणकर, वसंत कामथे, विलास थोरात,संजय पवार, महेंद्र शिंदे, प्रकाश जगताप, मधुबाला कोल्हे, दत्तात्रय रोकडे, अश्विनी देसाई,सुनील कुंजीर, विजय कापरे, संदीप लव्हे, आबासाहेब खवले,अश्विनी गायकवाड, बापूसाहेब तावरे, सुरेश खोपडे, शंकर जोरकर, राधाकिसन जोंधळे, नागनाथ मुंडे, राहुल गायकवाड, अशोक बाणे, सिद्राम कांबळे, मनोज सटाले ,विश्वनाथ हेंद्रे, पांडुरंग जाधव, सोमनाथ शेंडगे आदीसह विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. आंदोलनादरम्यान पुरंदरच्या उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. शिक्षकांवरील वाढत्या अशैक्षणिक कामांचा बोजा कमी करावा, शिक्षकांना बीएलओ (BLO) कामातून तात्काळ मुक्त करावे, टीईटी परीक्षा व संचमान्यता संदर्भातील निर्णय रद्द करावेत, तसेच शिक्षण व्यवस्थेशी संबंधित प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावेत अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. आंदोलनादरम्यान शिक्षकांनी शासनाच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. शिक्षणाची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी शिक्षकांना केवळ अध्यापनाचे काम करण्याची संधी मिळावी आणि अशैक्षणिक कामांचा भार कमी करावा, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली. शासनाने शिक्षकांच्या मागण्यांची तातडीने दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी दिला.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment