Skip to main content
पुरंदर तालुक्यातील सासवड येथील तरटी मळा परिसरामधील जमिनीच्या वादातून पुतण्या काकावर ट्रॅक्टर अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ; तर नऊ जनावर सासवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील सासवड येथील तरटी मळा परिसरामध्ये जमिनीच्या वादातून पुतण्या आणि काकावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केलीची धक्कादायक घटना उघडकीस आली असून ,या प्रकरणांमध्ये सासवड पोलिसांनी एकाच कुटुंबातील नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, ही घटना एक जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजता सुमारास मोजे तरटी मळा सासवड येथील शेत जमीन गट नंबर 97/ 26, 97/09 मधील इसम नामे अभिषेक जगताप यांनी पुतण्या कुणाल व जीवे मारण्याचे उद्देशाने ट्रॅक्टर अंगावर घालून जखमी केले असून, नामे अभिषेक जगताप, कृष्णाकांत जगताप, लक्ष्मीकांत जगताप, उदय जगताप, प्रसाद जगताप, धनराज जगताप तसेच त्यांच्या घरातील महिला मनीषा जगताप, जयश्री जगताप, संध्या जगताप यांनी संगनमताने अभिषेक जगताप याला त्या दोघांना जिवंत ठेवू नको, असे म्हणून प्रवर्त केले व नंतर दगड फेकून मारहाण केली. म्हणून फिर्याद सुधाकर शिवाजी जगताप वय 65 वर्ष व्यवसाय शेती राहणार सासवड यांनी सासवड पोलीस स्टेशन येथे नऊ जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला सासवड पोलीस स्टेशन गु रजिस्टर नंबर 300/ 2026 भा.न्या.स.कलम 109(1), 125(a), 189 (2 ),190 ,191 (2),191( 3),352. 351 (2 )(3) नुसार नऊ जणांविरुद्ध सासवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या अधिपत्याखाली सासवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे हे पुढील तपास करीत आहेत.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment