Skip to main content
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वाघिरे महाविद्यालयात मानद सचिव ॲड संदीप कदम यांच्या उपस्थित राष्ट्रीय सायकल रॅलीच्या नियोजन बैठकीला अंतिम स्वरूप सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वाघीरे महाविद्यालय सासवड या ठिकाणी गुरुवार दिनांक 9 जुलै 2026 रोजी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री, ऑलिम्पिक असोसिएशनचे माजी अध्यक्ष दिवंगत अजित(दादा )पवार यांच्या जयंतीनिमीत्त २२ जुलैला पुणे ते बारामती राष्ट्रीय व राज्यस्तरीय सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या नियोजना संदर्भात वाघिरे महाविद्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत बोलताना मानद सचिव ॲड संदीप कदम म्हणाले "राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन ही अभिमानाची बाब असून, सर्वांनी जबाबदारीची जाणीव ठेवून उत्कृष्ट नियोजन करावे. स्पर्धकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक समितीने नियोजनबद्ध पद्धतीने कार्य करावे," असे मार्गदर्शन केले. या स्पर्धेचे आयोजन सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडीया नवी दिल्ली आणि सायकल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या सहकार्याने पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने केले आहे. या स्पर्धेत सहभागी होवू इच्छिणाऱ्यांनी नावनोंदणी करावी, असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव अॅड. संदीप कदम यांनी केले आहे, स्पर्धेचे हे दहावे वर्ष आहे. ही स्पर्धा चार गटात घेतली जाते. त्यामध्ये 122 किलोमीटरची पुणे ते बारामती पुरूषांसाठी राष्ट्रीय आणि राज्यस्तर, सासवड ते बारामतीही 85 किलोमीटरची पुरूषांसाठी खुली राज्यस्तरीय एमटीबी स्पर्धा आणि खास महिलांसाठी माळेगाव ते बारामती ही 15 किलोमीटरची राष्ट्रीय स्पर्धा होते. प्रत्येक गटात प्रथम तीन क्रमांक मिळविणाऱ्या स्पर्धकांना रोख पारितोषिक आणि स्मृतिचिन्ह दिले जाते. तसेच दिवे घाट प्रथम पार करणाऱ्या स्पर्धकाला राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर घाटाचा राजा हा मानाचा पुरस्कार दिला जातो. या स्पर्धेसाठी देशभरातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील 450 स्पर्धक सहभागी होत असतात. स्पर्धेसाठी कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क आकारले जात नाही. त्यामुळे इच्छूकांनी सोबत दिलेला क्युआर कोड स्कॅन करून आपली नावनोंदणी करावी. तसेच याबाबत सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे सचिव संजय साठे (7972189670) आणि डॉ. योगेश पवार (9850952787) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन अॅड. कदम यांनी केले. या सभेस मानद सचिव ॲड संदीप कदम उपसचिव एल एम. पवार, डॉ. दिगंबर दुर्गाडे, विजय कोलते, बंडू (तात्या) जगताप, डॉ. रामदास कामठे, राहुल गायकवाड, गणेश जगताप आदी मान्यवर तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके, फार्मसी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. जयश्री चव्हाण उपप्राचार्य डॉ. संजय झगडे, उपप्राचार्य डॉ. बी. यु माने, वाणिज्य विभाग समन्वयक डॉ. नरसिंग गिरी यांच्या उपस्थितीत सभा संपन्न झाली. या सभेचे सूत्रसंचालन प्रा. नितीन लगड यांनी केले. तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य डॉ. संजय झगडे यांनी मानले. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, सहकारी प्राध्यापक, प्रशासकीय सेवक व कर्मचारी उपस्थित होते.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment