Skip to main content
पुरंदर तालुक्यातील सासवड पोलिसाकडून बेवारस वाहनांच्या मालकांचा शोध सात दिवसात प्रतिसाद न दिल्यास कायदेशीर लिलाव सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड पोलीस ठाण्याच्या आवारामधील अनेक वर्षापासून पडून असलेल्या 65 बेवारस च्या मूळ मालकांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले असून, या वाहन मालकांनी आठ दिवसांमध्ये कागदपत्रासह आपली वाहने ताब्यात घ्यावीत असे आव्हान पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी केले असून, पोलीस ठाण्याच्या आवारामधील ही वाहने पडून असल्याने, जागेची टंचाई आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संतोष घोळवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे आणि पथकाने गंगा माता वाहन शोध संस्था व आरटीओच्या मदतीने ही मोहीम राबवली, गंजलेल्या इंजिनाच्या आणि चेसिस नंबर वरून तांत्रिक माहिती मिळवून मालकाची ओळख पटवण्यात आली आहे. संबंधित मालकांना पत्रे पाठवण्यात आली असून, त्यांनी सात दिवसाच्या आत प्रतिसाद न दिल्यास वाहनांचा कायदेशीर लिलाव केला जाईल, लिलावातून मिळणारी रक्कम सरकारी तिजोरीत जमा केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिलेला आहे.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment