Skip to main content
पुरंदर तालुक्यातील नायगाव व राजुरी या ठिकाणच्या मध्यवर्ती ठिकाणच्या क्षेत्रामध्ये मस्कोबाच्या मंदिरासमोर भीषण अपघातामध्ये दोघांचा मृत्यू तर जेजुरी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील नायगाव राजुरी हद्दी मधील मध्यवर्ती ठिकाणच्या मस्कोबाच्या मंदिरासमोरील सासवड सुपा मार्गावर झालेल्या भीषण दुचाकी अपघातामध्ये दोन युवकांचा मृत्यू झाल्याची दुःखदायक घटना घडली आहे. याप्रकरणी जेजुरी पोलीस ठाण्याच्या भारतीय न्यायसहिता तसेच मोटार वाहन कायद्यान्वये त्यांच्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुर्गेश रामप्रसाद गोड वय 35 राहणार रिसेपिसे ता. पुरंदर मूळ राहणार मध्य प्रदेश हा त्यांच्या ताब्यातील स्प्लेंडर एमएच १२ एक्स सीडी 88 67 कडून सुप्याकडे जात होता, त्यावेळी त्याने भरधाव वेगामध्ये बेधारकपणे व हायगईने वाहन चालवत विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये प्रवेश केला, त्यामुळे समोरून सुप्या कडून नायगाव कडे येणाऱ्या ऋषिकेश सुदर्शन चौडकर वय 19 राहणार नायगाव ता. पुरंदर यांच्या बॉक्सर दुचाकीला जोरदार धडक बसली. या भीषण धडकेमध्ये दुर्गेश गोड व ऋषिकेश चौंडकर या दोघांच्या डोक्याला व शरीरावर गंभीर अशी दुखापत झाल्या होत्या. उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. अपघातात दोन्ही दुचाकीची मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी जेजुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 175/ 2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 106 (1), 281, 125 (अ), 125( ब) 324 (2 -66) तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी व बीट अंमलदार संदीप कारंडे हे पुढील तपास करीत आहेत.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment