Skip to main content
शिवरीच्या महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाचा विद्यार्थी स्वराज कामथें शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्यात पहिला सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा राज्यात आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल दि. २ जुलै रोजी जाहीर झाला असून इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत शिवरी येथील महात्मा ज्योतीराव फुले विद्यालयाच्या विद्यार्थ्यांने घवघवीत यश संपादन केले आसून इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत या विद्यालयाचा स्वराज नवनाथ कामथे या विद्यार्थ्याचा 300 पैकी 248 गुण मिळवून गुणवत्ता यादीत तालुक्यात प्रथम क्रमांक आला आहे. तसेच यापूर्वी त्याने एनएमएमएस 2025-26 शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेला आहे. तर शिवरी येथील विद्याल्यात तो एकमेव विद्यार्थी आहे. पुणे जिल्हा गुणवत्ता यादीत तो ग्रामीण रँकमध्ये 164 वा आला आहे. हा विद्यार्थी शिष्यवृत्ती मध्ये तालुक्यात पहिला आल्यामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या यशामागे विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण परिश्रम, शिक्षकांचे प्रभावी मार्गदर्शन, मुख्याध्यापकांचे नियोजन आणि पालकांचे सहकार्य महत्त्वाचे ठरल्याचे विद्यालयाचे शिक्षक विभाग प्रमुख सौ. कविता टिळेकर व ओंकार कादबाने यांनी सांगितले. चाचण्यांचे नियमित आयोजन करण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि यशाचा आलेख उंचावत असल्याचेही त्यांनी सांगितले. शाळेत राबविण्यात येणारे विशेष मार्गदर्शन आणि शिक्षकांच्या अथक परिश्रमांमुळेच हे यश मिळाल्याचे विद्यालयाचे मुख्याध्यापक रमेश महाडिक यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल विद्यालयाचे मुख्यध्यापक, कर्मचारी, उपमुख्याध्यापक व शिवरी ग्रामस्थ यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment