Skip to main content
पुरंदर तालुक्यातील नायगाव व राजुरी मध्यवर्ती ठिकाणच्या मसोबा मंदिरा समोरील रस्त्यावर दोन दुचाकींची धडक तर युवकाचा जागीच मृत्यू सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील नायगाव व राजुरी मध्यवरती येथील मसोबा मंदिरासमोरील रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक होऊन एका युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी दि. 3 जुलै रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारामध्ये घडली असून, याप्रकरणी जेजुरी पोलीस ठाण्यामध्ये फेटल मोटर अपघात रजिस्टर क्रमांक 06/ 2026 दाखल रोजी करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील कुलारी येथील रहिवाशी दुर्गेश ठाकुर वय 35 हे एम एच बारा एक सीडी 88 67 क्रमांकाच्या मोटार सायकल वरून पारगाव मेमाने येथून नायगावच्या दिशेने जात होते ,नायगाव व राजुरी येथील मध्यवरती गावाच्या हद्दीतील म्हसोबा मंदिरासमोरील रस्त्यावर समोरून येणाऱ्या अज्ञात मोटार सायकलची त्यांच्या दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक झाली या भीषण अपघातामध्ये दुर्गेश ठाकूर यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर समोरील अज्ञात मोटार सायकल वरील चालक गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी उरुळी कांचन येथील रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेची खबर रुपेश मुन्ना ठाकूर वय 30 राहणार कोलारी तालुका देवरी जिल्हा सागर मध्यप्रदेश यांनी दिली. त्यानुसार जेजुरी पोलीस ठाण्यामध्ये फेटल मोटार अपघाताची नोंद करण्यात आली आहे. सदर प्रकरणात पोलीस हवालदार एस.बी. लोंढे यांनी नोंद केली असून, सहाय्यक फौजदार संदिप कारंडे हे पुढीलच तपास करत आहेत. अपघाताची नेमके कारण तसेच अज्ञात दुचाकी व तिच्या चालकांची ओळख पटविण्याचे काम पोलीस करीत आहेत.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment