Skip to main content
पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी जुन्या वादा मधून तरुणावर कोयत्याने हल्ला ; तर खंडोबा नगर येथील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड येथील खंडोबा नगर परिसरामधील किरकोळ कारणावरून एका तरुणावर कोयता आणि दगडाने जीवघेणा हल्ला करण्यात आला असून, या प्रकरणी सासवड पोलिसांनी पाच जणाविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले असून, या परिसरामध्ये खळबळ उडाली आहे, सागर बबलू नाथू वय 23 राहणार खंडोबा नगर यांनी याप्रकरणी फिर्याद दिलेली असून, रविवारी दि. 28 जून रोजी सकाळी पावणे नऊच्या सुमारामध्ये सागर हे विराज किराणा स्टोअर समोरून जात असताना, ही घटना घडली असून, पिंकी पांडुरंग पवार हिने फिर्यादीकडे नसलेले पैसे मागत शिवीगाळ व मारहाण केली त्यानंतर महादेव खुडे व नंदिनी पवार यांनी त्याच्या डोक्यात व पोटात दगडाने मारहाण केली, यावेळी रोहन पांडुरंग पवार यांनी कोयत्याने वार केला जो चुकवताना सागर याच्या हाताला गंभीर अशी दुखापत झाली असून, तसेच सुरज विटकर यांनी ठार मारण्याची धमकी देत सागर याच्या डाव्या कानामागे वार करून, त्यांना जखमी केले जखमी तरुणावर खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत, पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक परमेश्वर गोडसे पुढील तपास करत आहेत.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment