Skip to main content
पुरंदर तालुक्यामध्ये पाणी फाउंडेशन तर्फे आयोजित 'सत्यमेव जयते फार्मर कप 2026' स्पर्धेमध्ये पुरंदर मधील 58 गट सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : पाणी फाउंडेशन फार्मर कप स्पर्धा या कार्यक्रमाचा डिजिटल शुभारंभ माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व आमिर खान यांच्या शुभहस्ते करण्यात आला असून, याचे ऑनलाइन थेट प्रक्षेपण पंचायत समिती पुरंदर येथील सभागृह सासवड येथे या ठिकाणी तालुका कृषी अधिकारी श्रीधर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले, यावेळी पाणी फाउंडेशन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या 'सत्यमेव जयते फार्मर कप 2026' स्पर्धेमधील पुरंदर तालुक्यामधील 58 शेतकरी गटांनी यामध्ये सहभाग नोंदवला आहे. सासवड येथे पंचायत समितीच्या कार्यक्रम संपन्न झाला, याप्रसंगी अंजीर व सीताफळ संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉक्टर युवराज बालगुडे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कृषी विभागाचे संदीप कदम, अतुल हिंगणे तसेच पाणी फाउंडेशनचे मयूर साळुंके ,उमेद अभियानाच्या तालुका समन्वयक नंदा कुरडे, तसेच गणेश किकले, तालुक्यातील विविध शेतकरी गट, महिला गट आदी उपस्थित होते.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment