Skip to main content
पुरंदर तालुक्यातील काळेवाडी( दिवे )येथे "हरितक्रांती प्रणेते आदर्शवत लोकनेते" .वसंतराव फुलसिंग नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन साजरा सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते माननीय वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलाने करण्यात आली .नंतर ,पुणे जिल्हा परिषद सदस्य ,पंचायत समिती सभापती व पंचायत समिती सदस्य, दिवे पंचक्रोशी सरपंच* व सदस्य यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आल खरीप हंगाम 2025 26 मध्ये घेण्यात आलेल्या पिक स्पर्धेअंतर्गत विजेत्या शेतकऱ्यांना प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. मा.तालुका कृषी अधिकारी पुरंदर श्रीधर चव्हाण यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करून येणाऱ्या खरीप हंगामात कमी पर्जन्य या हवामान बदल घटकास सामोरे जाण्यासाठी उपस्थित शेतकऱ्यांना प्रेरित केले तसेच कार्यक्रमांतर्गत घेण्यात येणाऱ्या व्याख्यानांची प्रस्तावना करून उपस्थित शेतकऱ्यांना शुभेच्छा देऊन कार्यक्रमास सुरुवात केली. कार्यक्रमादरम्यान ..... डॉ. प्रदीप दळवे यांनी सिताफळ व अंजीर फळपीक लागवड तंत्रज्ञान- कमी पाण्यामध्ये फळपिक वाढ उपाययोजना यावर सखोल मार्गदर्शन केले. डॉ. युवराज बालगुडे यांनी अंजीर व सिताफळ यावर येणाऱ्या कीड व रोगाचे व्यवस्थापन या संदर्भात शेतकऱ्यांशी संवाद साधला. दीपक गावडे (शास्त्रज्ञ केवीके बारामती) एल निनो अर्थात कमी पावसाचे प्रमाण या हवामान बदल घटकास कसे निराकरण करण्यात येईल या संदर्भात फळपीक भाजीपाला फुल पीक यांची लागवड तंत्रज्ञान कसे असावे या संदर्भात मार्गदर्शन केले. उमेश निकम कृषी अधिकारी बँक ऑफ महाराष्ट्र ग्रामीण विकास केंद्र भिगवन यांनी शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसाय बाबत प्रशिक्षणासाठी व शेतकरी कर्ज बाबत मार्गदर्शन केले .अतुल सस्ते (प्रगतशील शेतकरी साकुर्डे )यांनी उपस्थित शेतकऱ्यांना ब्रॉड बेड फरो बीबीएफ लागवड प्रशिक्षणाचे मार्गदर्शन करून बीबीएफ यंत्राची ओळख करून दिली. गणेश जगताप उपकृषी अधिकारी सासवड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून शेवटी आर .डी .खेसे मंडळ कृषी अधिकारी सासवड यांनी कार्यक्रमची आभार प्रदर्शन मानून सांगता केली.कृषी दिनानिमित्त उपस्थित सर्व शेतकऱ्यांना आम्रवृक्षाचे रोप देण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन माननीय तालुका कृषी अधिकारी श्रीधर चव्हाण आर. डी. खेसे (मंडळ कृषी अधिकारी सासवड )श्री.जी. के. जगताप (उप कृषी अधिकारी सासवड) यांच्या मार्गदर्शनाखाली सासवड मंडळ कृषी अधिकारी कार्यालय अधिनस्त सर्व सहाय्यक कृषी अधिकारी यांनी केले होते .
Popular posts from this blog
Comments
Post a Comment