Skip to main content
पुरंदर तालुक्यातील नायगाव व राजुरी या ठिकाणच्या मध्यवर्ती ठिकाणच्या क्षेत्रामध्ये मस्कोबाच्या मंदिरासमोरील अपघातामध्ये नायगाव येथील युवकाचा मृत्यू तर नायगाव करावर शोककळा पसरली सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : पुरंदर तालुक्यातील नायगाव येथील युवक ऋतुराज सुदर्शन चौडकर वय 19 याचा सासवड सुपा मार्गावरील नायगाव व राजुरी येथील मध्यवर्तीच्या ठिकाणी असणाऱ्या मस्कोबा मंदिरासमोरील झालेल्या भीषण अपघातामध्ये दुर्दैवी असा मृत्यू झाला, या घटनेमुळे नायगाव सह संपूर्ण परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत असून, गावावर शोक कळा पसरली आहे, ऋतुराजनी नुकतेच बारावीचे शिक्षण पूर्ण केले होते, शांत, मनमिळाऊ , नम्र आणि कष्टाळू स्वभावामुळे परिसरात गावातील सर्वांचा लाडका होता, प्रत्येकाशी आधाराने व प्रेमाने वागणारा ऋतुराज सामाजिक उपक्रमामध्ये उत्साहाने सहभागी होत असून, त्याच्या अकाली निधनाने कुटुंबीयास मित्रपरिवार आणि ग्रामस्थांना मोठा धक्का बसला असून, त्याच्या पश्चात आजी, आजोबा, आई ,वडील, चुलते, चुलती, भाऊ असा परिवार आहे. नायगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे माजी अध्यक्ष गिरीधर चौडकर यांचा तो नातू होत तर सामाजिक कार्यकर्ते सुदर्शन चौडकर यांचा मुलगा होता, ऋतुराजच्या निधनाबद्दल परिसरातील विविध सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला असून, चौडकर कुंटूभिया प्रति संवेदना व्यक्त करण्यात येत आहेत.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment