Skip to main content
पुरंदर तालुक्यात 17 लाखाच्या कर्जासाठी सात लाख व्याज वसूल तर ; 70 आर बागायती जमीन नावावर केल्याचा आरोप तिघांवर सासवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : आईच्या कॅन्सरच्या उपचारासाठी आणि आर्थिक अडचणीमुळे 17 लाख रुपये कर्ज घेतलेल्या व्यवसायाकडून तब्बल सात लाख रुपये व्याज व इतर स्वरूपात वसूल करण्यात आले असून, त्यानंतरही त्यांच्या आई वडिलांच्या नावावरील 70 आर बागायती जमीन फसवणुकीने स्वतःच्या नावावर करून घेतली, याबाबत तिगावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याप्रकरणी ऋषिकेश रामदास चांदगुडे राहणार केशवनगर मुंढवा पुणे यांनी सासवड पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिलेली आहे त्यानुसार संदीप सुखदेव दळवी, महेश सूर्यकांत गायकवाड दोघे राहणार हिवरे तालुका पुरंदर तसेच दिलीप भिंताडे पूर्ण( नाव पत्ता उपलब्ध नाही) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम पालवे करीत आहेत. फिर्यादीनुसार त्यांच्या वडिलाकडून घेतलेल्या कुलमुखत्यारपत्राचा गैरफायदा घेत आरोपींनी बारामती तालुक्यातील मौजे अंबी खुर्द येथील गट क्रमांक 189 मधील 70 आर बागायती जमीन फसवणुकीच्या स्वतःच्या नावावर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित दस्ताची नोंद पुरंदर दुय्यम निबंध कार्यालयात झाल्याची फिर्यादीने म्हटले आहेत, याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सर्व व्यवहाराची कागदपत्रे आर्थिक देवाण-घेवाण आणि जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया यांचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी दिली आहे .या घटनेमुळे पुरंदर तालुक्यातील खाजगी सावकारकीचा पुन्हा एकदा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment