Skip to main content
पुरंदर तालुक्यातील ढुमेवाडी येथून दुचाकी चोरीला ; तर सासवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड जवळील ढुमेवाडी येथील श्रावक निवासच्या पार्किंग मधून अज्ञात चोरट्याने हँडल लॉक केलेली दुचाकी गाडी चोरून नेली याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, प्रेम सरजू विश्वकर्मा राहणार ढुमेवाडी यांनी यासंदर्भात फिर्याद दिलेली आहे. विश्वकर्मा यांनी त्यांची हिरो स्प्लेंडर दुचाकी इमेज 14 के आर 0 741 रविवारी दिनांक 28 जून रोजी रात्री आठच्या सुमारामध्ये इमारतीच्या पार्किंग मध्ये उभी केली होती, दुसऱ्या दिवशी सकाळी नऊच्या सुमारामध्ये त्यांनी दुचाकी जागेवर नसल्याचे दिसून त्यांना आले, परिसरामध्ये शोध घेतला असता दुचाकी न सापडल्याने त्यांनी पोलीस स्टेशनला धाव घेतली, सासवड पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे, पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या अधिपत्याखाली पुढील तपास पोलीस हवालदार दत्ता शेगर हे पुढील तपास करीत आहेत.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment